Post Top Ad
Responsive Ads Here
18/03/2024
Home
Unlabelled
प्रयोगशील युवा शेतकऱ्याची गगनभरारी ~ ~ ~ 4 एकर शेतात कलिंगडाचे 15 लाखाचे उत्पन्न...
प्रयोगशील युवा शेतकऱ्याची गगनभरारी ~ ~ ~ 4 एकर शेतात कलिंगडाचे 15 लाखाचे उत्पन्न...
महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातले प्रयोगशील युवा शेतकरी दिनदयाल समाधान पाटील उर्फ बाबा यांनी आपल्या 4 एकर शेतात कलिंगडाचे पिक घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती त्यांनी मिळवली. पिक घेण्यासाठी आवश्यक खर्चाची आणि मनुष्यबळाची जुळवाजुळव करून त्यांनी कामाला सुरूवात केली. अवघ्या तीन महिन्यात अगदी विक्रमी पीक हाती आलं आणि त्यांनी या पिकाची निर्यात करण्याचा निर्णय घेतला. आनंदाची गोष्ट म्हणजे या कामासाठी त्यांना साधारण अडीच लाख रूपये खर्च आला आणि सर्व खर्च वजा जाता 15 लाख रूपये इतका निव्वळ नफा त्यांना मिळाला.
युवा शेतकरी यांनी शेतीकडे वळले पाहिजे व नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून शेती केली पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन विक्रमी नफा घेत आदर्श निर्माण करण्याऱ्या या शेतकऱ्याने इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठीही एका नव्या उत्पन्नाचे दार खुले केले आहे. शेतीकडे वळू इच्छिणाऱ्या युवा पीढीसाठी हे निश्चितच प्रेरक आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment