ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

26/03/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

         चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड  इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी सौ संध्याताई नरेश महाजन (मा. नगर सेविका, चोपडा), डॉ रोहन महेंद्र पाटील, प्राचार्य डॉ डी. ए. सूर्यवंशी , शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे, डी. जी. सोमानी, अशोक साळुंखे, शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्राचार्य डी. ए. सूर्यवंशी डॉ. रोहन पाटील यांनी मार्गदर्शन केले

         इयत्ता आठवीतील दक्ष प्रवीण जयस्वाल हा विद्यार्थी मॅथेक्स परीक्षेतील पहिली फेरी उत्तीर्ण करून द्वितीय फेरीसाठी पात्र ठरला. एमटीएस परीक्षेमध्ये इयत्ता दुसरीचा विद्यार्थी स्नेह प्रमोद पाटील यांने चोपडा तालुक्यात अकरावा क्रमांक तर राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 33 वा क्रमांक पटकावला. इयत्ता चौथीतील विद्यार्थीनी आरुषी दशरथ पाटील हिने चोपडा तालुक्यात दुसरा क्रमांक तर जळगाव जिल्ह्यात बारावा क्रमांक पटकावला. इयत्ता सहावीतील अक्षय हनुमंत सदाफुले या विद्यार्थ्याने सोनी टीव्हीवरील सुपरस्टार सिंगर तीन या  प्रतियोगितेच्या पहिल्या फेरीमध्ये यश संपादन केले. या चारही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आला. 

          विज्ञान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. विज्ञानावर आधारित अनोख्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमधील विजेते भारद्वाज संदीप पाटील, आराध्या सचिन पाटील, खीजर शेख,  लाव्या प्रफुल पाटील्, गौतमी राकेश कोळी आणि कृतज्ञा विष्णू पाटील या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. इयत्ता दुसरीचे विद्यार्थी हर्षवर्धन रोहिदास कोळी, लवीन लालचंद पटले, आरव भावसार आणि पार्थ संदीप पाटील यांना देखील पारितोषिक देण्यात आले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजेते माही पराग पाटील, देवांश विलास राणे, मयंक शशांक पाटील, जीत उज्वल पाटील, सारा रेहान सय्यद, राजवीर सुनील पारधी, युजुर्व जितेंद्र पाटील, स्मिथ संदीप पाटील, सोहम दीपक पाटील यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

         इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत विहान राठोड, द्रोण पाटील, विधी मधवाणी, रीत मलानी, निलय बोरसे. गोपेश अग्रवाल, जयेश महाजन, कल्पेश चावरे, अपूर्व सूर्यवंशी, दिव्यांशु पाटील, मोईन शेख, रिद्धी पाटील यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थी अंश जाधव, रुद्र चौधरी, पार्थ शिंपी, तसेच आराध्या वानखेडे, जानवी भदाणे, इंद्रायणी पाटील, इरम पटेल, नील सोनवणे,  निशांत पाटील, सिया मेहेर, मानवी गेही, यज्ञा बेलदार, हंसिता पाटील, प्राजक्ता कोळी, अंतरा पाटील या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.

          इयत्ता सहावीतील विद्यार्थी वीर सोनवणे, आदित्य पाटील, शाश्वत गायकवाड, तेजस राठोड, खरांशू सोनवणे, सुशील सोनवणे, सार्थक कदम, खूशी देवरे, खुशल देवरे आणि वेदांत माळी या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. इयत्ता सातवीतील विद्यार्थी विराज गुजराथी, अंश पाटील, स्पर्श सोनकांबळे, श्रीजा लासुरकर, जीत पाटील, हितेन सूर्यवंशी, सुमित चव्हाण या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.

         इयत्ता आठवीतील विद्यार्थी दिव्यतेज पाटील, दक्ष जयस्वाल, पारस पाटील, पार्थ कोळी, जगदीश पारधी, आयुष सोनवणे, जय राणे आणि जयराज पाटील या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक कल्पना बारी, अर्चना जैन, विशाल मराठे, वैभव मराठे, सलोणी अग्रवाल, धनश्री पवार आणि स्वरांगी अहिरे यांचे  मार्गदर्शन लाभले. 

         आय. एम. ओ. ओलंपियाड परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात गुणगौरव करण्यात आला. यांमध्ये हिमांशू पाटील, आराध्या पाटील, भारद्वाज पाटील, जीत पाटील, श्रीजा लासुरकर, प्रांजल शिरसाठ, आर्या सोनवणे, दक्ष जयस्वाल, हर्षित पालीवाल, अपूर्व सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा समावेश होता. अपूर्व समाधान सूर्यवंशी आणि प्रांजल भिकन शिरसाठ हे विद्यार्थी आय एम ओ परीक्षेच्या द्वितीय फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका अश्विनी पाटील आणि प्राजक्ता सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

         NASO परीक्षेमध्ये स्नेह पाटील, दर्शना माळी, शिवम पाटील हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका धनश्री पवार आणि विशाल मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.

         मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील विजेत्या स्पर्धकांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. या विजेत्या स्पर्धकांमध्ये इयत्ता पहिलीतील आराध्या सचिन पाटील, लाव्या प्रफुल्ल पाटील, रुपेश गणेश पाटील, इयत्ता दुसरीतील प्रिशा सुरेश पवार, अंशिका अविनाश जाधव, कनिष्का शुभम पाटील, इयत्ता तिसरीतील यजुर्व जितेंद्र पाटील, मयंक शशांक पाटील आणि सारा रेहान सय्यद या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या स्पर्धांसाठी शाळेतील शिक्षिका कीर्ती चौधरी आणि सुषमा पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

          कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळेतील शिक्षिका धनश्री पवार, जुईली ठाकरे आणि शितल भावसार यांनी आकर्षक रांगोळी काढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गायकवाड, सारिका पवार,अर्चना जैन,वैभव मराठे, प्राजक्ता सोनवणे, सुषमा पाटील आणि कल्पना बारी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुचिता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज