नांदेड येथे " वामन महाराज जन्मोत्सव " यात्रा शांततेत संपन्न - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

26/03/2024

नांदेड येथे " वामन महाराज जन्मोत्सव " यात्रा शांततेत संपन्न

 

चोपडा (प्रतिनिधी) : -

          नांदेड येथे " वामन महाराज जन्मोत्सव " यात्रा शांततेत संपन्न

         नांदेड, ता.धरणगांव येथे दरवर्षी प्रमाणे 24 मार्च रोजी वामन महाराज यांचा जन्मोत्सव निम्मित यात्रा भरते, असंख्य भाविकांची येथे पुजेसाठी अलोट गर्दी असते, वामन महाराज यांच्या कडे जे लोक नवस करून मागणी करतात त्यांची ईच्छा पूर्ण होते अशी येथील समाधी (मंदिराची) ख्याती आहे. म्हणून येथे ईच्छूक लोक अन्नदान देणारे लोक येथे नंबर लावतात.अजुन पाच वर्षे अन्नदान देणारे लोकांची नावे बुक झाली आहेत. 

         या "वामन महाराज जन्मोत्सव" यात्रेचे आयोजक डाॅ. पृथ्वीराज सैंदाणें नांदेड( ह.मु. चोपडा) हे येथील आयोजक आहेत, ह्या वर्षी अन्नदान ( महाप्रसादाचा कार्यक्रम) दिलीपराव बळीराम नंन्नवरे रवंजे बु.( ह.मु. अहुजा नगर जळगांव) यांनी दिले आहे. आणि खास वामन महाराज यांची जन्म कहाणी (अख्यायिका) वाचण्यासाठी ललित कला केंद्र, चोपडा आलेले प्रा. संजय नेवे यांनी त्यांच्या सुरेल आवाजात अख्यायिका वाचण्यात आली. नंतर महापुजा करण्याचा मान दिलीपराव न्नंनवरे सह पत्नीक होते. 

            तसेच बाहेर गावावरून येणारे भाविक तसेच कमलबाई मोरे औरंगाबाद,  सतीष मोरे, प्रभाकर मोरे, विलास मोरे, उज्ज्वला ब्राम्हणे पाचोरा, सुनिता अंभोरे औरंगाबाद, तसेच कांदिवलीचे राजेंद्र सैंदाणें, अमळनेरचे सुमनताई मोरे, सुरज संदानशिव , प्रा.दिलदार सैंदाणें, कमांडो कॅप्टन :- अनिल मोरे, जितेंद्र मोरे, दिपक वाघ, युवराज चव्हाण , जळगांवचे भिमराव नंन्नवरे, संजय कदम, पितांबर नंन्नवरे, एरंडोलचे अनिल सैंदाणें, पांडुरंग लाखे सोनवदकर, चोपडाचे गौतम शिंदे, विलास टेके, युवराज सैंदाणें, सिध्दार्थ सैंदाणें, शिरपूरचे मनोहर वाघ, मधुकर सोनवणे, दहिवदचे बापु सोनवणे, औरंगाबादचे तहसीलदार अंभोरे साहेब, वामन मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे मालक :- प्रभाकर मोरे, तसेच नांदेड ग्रा.पं. सदस्य तात्या साहेब, सुनिल चिंतामण सैंदाणें, तसेच नांदेड येथील सर्व भावकी, व गांवकरी लोक या " वामन महाराज जन्मोत्सव " यात्रेस उपस्थित होते. हा कार्यक्रम शांततेत संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज