ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इंग्रजी भाषा दिवस उत्साहात साजरा . . . . - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

23/04/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इंग्रजी भाषा दिवस उत्साहात साजरा . . . .

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इंग्रजी भाषा दिवस उत्साहात साजरा . . . .

       महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ इंग्रजी लेखक, कवी, नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त दिनांक 23 एप्रिल रोजी 'इंग्रजी भाषा दिवस'  निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 

         कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सातवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थानींनी सादर केलेल्या स्वागत गीताने करण्यात आली. प्रमुख पाहुणे पद्माकर पाटील, शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे, डी. एस. पाटील, मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि उपमुख्याध्यापक अमन पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पद्माकर पाटील आणि डी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतनृत्य सादर केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय इंग्रजीतून करून दिला तसेच इंग्रजी कवितांवर आकर्षक असे सादरीकरण प्रस्तुत केले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी 'वुई शाल ओवर कम' या कवितेवर सादरीकरण प्रस्तुत केले. अनोख्या शैलीत इयत्ता दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून कथाकथन प्रस्तुत केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी 'इच वन टीच वन' आणि 'ह्युमॅनिटी बिइंग विथ अस्' या नाटिका सादर केल्या. इयत्ता चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा जाहिराती सादर केल्या. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व सादर केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये सहभाग नोंदविला. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शेक्सपियरच्या जगप्रसिद्ध नाटक 'मॅकबेथ' मधील प्रसंगाचे सादरीकरण केले. दिव्या भालेराव आणि भूमी देवरे या विद्यार्थिनींनी इंग्रजी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले.

         विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पद्माकर पाटील यांनी रोजच्या जीवनातील इंग्रजीचे स्थान आणि शेक्सपियर यांचे इंग्रजी भाषेतील योगदान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय संवादाची एक भाषा आहे. भिन्न देश आणि संस्कृतीतील लोक इंग्रजीमध्ये एकमेकांशी संवाद साधण्यास सक्षम आहेत, जरी ती त्यांची पहिली भाषा नसली तरीही. इंग्रजी भाषा जागतिक सहकार्य, संपर्क आणि मुत्सद्देगिरीसाठी एक आवश्यक साधन बनवते. कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवसाय, दळणवळण, आंतरजाल तसेच शिक्षण यासारख्या विविध कार्यक्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेचा वापर अधिक प्रमाणात होताना दिसतो. विविध सरकारी तसेच खाजगी कार्यालयांमध्ये देखील इंग्रजीचा वापर वाढला आहे.

          शेक्सपियरचा आधुनिक काळातील इंग्रजीवरही मोठा प्रभाव पडला. जेव्हा ते लिहीत होते, तेव्हा 16 व्या आणि 17 व्या शतकात, इंग्रजी भाषा खूप बदलांमधून जात होती आणि शेक्सपियर यांनी इंग्रजी भाषेत शेकडो नवीन शब्द आणि वाक्ये तयार केली जी आजही वापरली जातात. यातून त्यांची सर्जनशीलता दिसून येते. 

          कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करतांना प्राध्यापक डी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना एल एस आर डब्ल्यू (LSRW) विषयी सखोल मार्गदर्शन केले. मातृभाषा जशी ऐकून सहज अवगत करता येते त्या पद्धतीने इंग्रजी भाषा अवगत करण्याचे सोपे उपाय त्यांनी विद्यार्थ्यांना सुचविले. विद्यार्थ्यांनी शब्दसाठा वाढवणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी इंग्रजी भाषेतील साहित्याचे वाचन करणे, बातमी ऐकणे यांसारख्या छोट्या छोट्या उपयुक्त उपाययोजनां विषयी मार्गदर्शन केले.

          या सर्व कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उप मुख्याध्यापक अमन पटेल, अश्विनी पाटील, दीप्ती पाटील, दिपाली पाटील, प्राजक्ता सोनवणे, सारीका पवार, वैशाली गायकवाड, अश्विनी ढबू, कामिनी पाटील व जुईली ठाकरे या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका दीप्ती पाटील, प्राजक्ता सोनवणे आणि इयत्ता दहावीतील विद्यार्थी हिरल ठक्कर आणि नावीन्य चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन सारिका पवार यांनी केले. 

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज