होम वोटिंग वर असणार कॅमेराची नजर ; क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत गजेंद्र पाटोळे यांचे प्रतिपादन..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

24/04/2024

होम वोटिंग वर असणार कॅमेराची नजर ; क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत गजेंद्र पाटोळे यांचे प्रतिपादन.....


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          होम वोटिंग वर असणार कॅमेराची नजर ; क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत गजेंद्र पाटोळे यांचे प्रतिपादन.....

          वयोवृद्ध असे ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या मतदारांसाठीच होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून सर्व क्षेत्र अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा अशा उमेदवारांची भेट घ्यावी. होम वोटिंग करताना उमेदवाराच्या घरी स्वतंत्र मतदार कक्ष उभारावा. होम वोटिंग करताना तेथे व्हिडिओ कॅमेरा नेऊन मतदान करतानाचे चित्रीकरण करावे. होम वोटिंगसाठी लवकरच गृहभेटींचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल त्यानुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी असे आवाहन रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी आढावा बैठकीत उपस्थित सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केले.
           यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि पदाधिकारी हजर होते.

          क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी आपल्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी मंडप उभारावेत. मतदान केंद्रांवर पाळणाघराची सोय करण्यात यावी. गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एनसीसी कॅडेट्स यांची मदत घेऊन आवश्यकता मूलभूत सुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात. मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडले तर योग्य ती खबरदारी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज