साडेपाच फुटच्या नागाला सर्पमित्राच्या मदतीमुळे जीवदान.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

09/04/2024

साडेपाच फुटच्या नागाला सर्पमित्राच्या मदतीमुळे जीवदान....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          साडेपाच फुटच्या नागाला सर्पमित्राच्या मदतीमुळे जीवदान...

       सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य सर्पमित्र श्री कल्पेश सूर्यवंशी यांनी अति जहाल विषारी नागाला वाचविले...

        चोपडा येथील नागलवाडी शिवारातील एका झोपडी जवळ साडेपाच फुटाचा भारतीय नाग - Spectacled Cobra निघाला. विषारी मोठ्या सर्पाला मारण्यासाठी एक व्यक्तीने त्यावर मोठ्या काठीने प्रहार केले. परंतु दुसऱ्या व्यक्तीने सर्पमित्राला बोलवण्यासाठी सुचवले. कॉल आल्यावर टीमचे धाडसी मित्र सदस्य श्री कल्पेश भाऊ नाग रेस्क्यू करण्यासाठी गेले.
           त्यांनी अडीअडचणीतून नाग पकडून त्यास बरणीत व्यवस्थित रित्या बंद करून आणले. त्यावर प्रथमोपचार करून नाग सुरक्षितपणे ठेवला आहे. दोन दिवसाच्या आत नागराजाला नैसर्गिक अधिवासात सातपुड्यात मुक्त करण्यात येईल. टीमचे सर्व सदस्य प्रति महिन्याला मोठ्या संख्येने बहुविध प्रजातींचे सर्प , पक्षी , प्राणी रेस्क्यू करतात , योग्य ट्रीटमेंट देतात , आवश्यकता भासल्यास पशुवैद्यकांची मदत घेतली जाते व नंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येते.
           कोणत्याही विषारी , निमविषारी , बिनविषारी सापाला रेस्क्यू करण्यासाठी , उपचारासाठी टीम कडे सर्पमित्र - कल्पेश सूर्यवंशी व इतर सदस्य उपलब्ध आहेत. सर्प निसर्ग साखळीतील अति मोलाचे घटक असून त्यांना मारू नये. त्याऐवजी साप , पक्षी व वन्यजीव रेस्क्यू करण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

             श्री हेमराज पाटील - 9922085434 पक्षी, वन्यजीव व वन संवर्धक.

     श्री कल्पेश सूर्यवंशी - 9049670713 सर्पमित्र

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज