चोपडा येथील डॉ.रोहन पाटीलची आगळी वेगळी सेवा ; गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची मोफत तपासणी सह औषधे, व ताकाच्या पाऊचचे वितरण ..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

20/04/2024

चोपडा येथील डॉ.रोहन पाटीलची आगळी वेगळी सेवा ; गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची मोफत तपासणी सह औषधे, व ताकाच्या पाऊचचे वितरण .....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपडा येथील डॉ.रोहन पाटीलची आगळी वेगळी सेवा ; गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची मोफत तपासणी सह औषधे, व ताकाच्या पाऊचचे वितरण .....

          वणी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अनेक दानदाते आपआपल्या परीने मदत करत असतात आणि सेवा देत असतात. आजच्या युगात डॉक्टरांचे कार्य म्हणजे फक्त पैसे कमविणे होय परंतु त्यात ही काही अपवाद असतात. असेच चोपडा येथील डॉ.रोहन महेंद्र पाटील, मिथुन महेंद्र पाटील या दोघा भावंडांनी पायी जाणाऱ्या भाविकांची औषधे परवून सेवाकार्य केले. 

         थाळनेर दरवाजा जवळ असलेल्या दवाखान्यात डॉ. रोहन पाटील हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. यांना राजकीय वारसा असला तरी कधीही ती गुर्मी अंगात न येऊ देता ते नेहमीचं असाह्य, गरीब, भोळीबाभडी लोकांसाठी आपले खिश्यातले पैसे देखील खर्च करून मदत करत असतात.
              डॉक्टरांचे कार्य काही वर्षांपूर्वी सेवाकार्य म्हणून ओळखले जायचे परंतु आता मात्र तो एक व्यवसाय झाला आहे. मात्र चोपड्यातील सर्वच डॉक्टर हे कोणत्या कोणत्या सामाजिक कार्यात पुढे असतात.

          चोपड्यातील अनेक डॉ. तर आलेल्या पेशंटकडे पैसे आहेत की नाही हाही विचार करत नाही आणि अगोदर उपचार महत्वाचे समजून त्याचे उपचार देखील करून देतात व पेशंट कडे पैसे देखील नसतात. त्याने दिले तर ठीक आहे अन्यथा सोडून देतात इतकं चांगल्या पद्धतीचे सर्वच डॉक्टरांचे वागणे होय.

         डॉ. रोहन पाटील यांनी तर स्वतः पैसे खर्च करून जवळपास 700 ते 800 लोकांना पुरेल इतक्या अंगदुखी, डोकेदुखी, तसेच टॉनिकच्या गोळ्या वाटप दि. 19 तारखेला धुळे तर मालेगावच्या मध्ये वितरण करण्यात आले. तसेच पायाला चिखल्या पडल्या असतील व पायी चालून चालुन मांड्याचे घसरण झाल्याने त्यावर देखील आवइंटमेंट ( ट्युब), इलेक्ट्रोल पावडर, वितरीत करण्यात आले. तसेच अनेकांची बिपी तपासणी, ताप तपासणी , पायाचा जखमाना ड्रसिंग करणे, अशी तपासणी केली. सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 8 वाजे पर्यंत ही सेवाकार्य ह्या दोघ भावाकडून करण्यात आले.

         यांच्या ह्या सेवेला होलसेल मेडिकल पुरविण्याचे काम प्रविण मिस्तरी, तर ताक पाऊच साठी बापू डेअरीचे संचालक बापू महाजन, अमळनेर येथील मेडिकल होलसेल मेडिकलचे विशाल माळी, आशिष जैस्वाल अश्या अनेक लोकांनी या कार्यासाठी मदत  मदत केली.

        डॉ. रोहन पाटील, मिथुन पाटील यांचा सोबत दवाखाण्यातील व मेडीकलचे कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर रोहन पाटील हे मागील चार वर्षांपासून हे सेवाभावचे कार्य नित्यनेमाने करत आहे. यांच्या दोघ भावाचा कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज