उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवा ; सभा रॅलींवर कॅमेऱ्याची नजर ~ ~ संदिपन खान - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

20/04/2024

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवा ; सभा रॅलींवर कॅमेऱ्याची नजर ~ ~ संदिपन खान


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवा ; सभा रॅलींवर कॅमेऱ्याची नजर ~ ~ संदिपन खान 

         लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर उमेदवाराने केलेल्या खर्चांवर लक्ष ठेवा उमेदवाराने आयोजित केलेल्या सभांमध्ये रॅलीमध्ये कोठे किती खर्च होत आहे यावर नजर असू द्या. यासाठी सभांमध्ये व्हिडिओ कॅमेरा नेऊन त्याची चित्रीकरण करा आणि अहवाल सादर करा अशा आशयाच्या सूचना रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संदिपन खान यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

          चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत त्यांच्यासोबत सहाय्यक खर्च निरीक्षक अशोक कुमार शर्मा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे तसेच व्हिडिओ सर्विलन्स टीम, व्हिडिओ व्हीविंग टीम, फ्लाईंग स्कॉड टीम, स्टॅटिक्स सर्व्हिलंस टीम, मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी तथा सहाय्यक उपस्थित होते.

          निवडणूक खर्च निरीक्षकांनी निवडणुकी बाबत मतदार संघात उमेदवारांनी केलेल्या खर्चांवर कसे लक्ष ठेवावे, कोणकोणत्या गोष्टींची नोंद घ्यावी, आंतरराज्य चेक पोस्टवर कशी तपासणी करावी याबाबत अधिक मार्गदर्शन केले. उमेदवाराने बँकेत स्वतंत्ररित्या उघडलेल्या खात्यावर देखील लक्ष ठेवावे. उमेदवाराने मोठ्या प्रमाणावर कोणती खरेदी केली यावरही लक्ष ठेवून त्याबाबतचा दैनंदिन अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याच्या सूचना नोडल अधिकारी आणि सहाय्यकांना देण्यात आल्या. 

        निवडणूक कर्तव्य पार पाडत असतानाच सर्व कर्मचाऱ्यांनी वाढत्या तापमानाचा विचार करून आपले आरोग्य देखील सांभाळण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज