रावेर लोकसभा मतदार संघांसाठी , चोपडा तहसील कार्यालयात क्षेत्रिय अधिकाऱ्याची बैठक संपन्न . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/05/2024

रावेर लोकसभा मतदार संघांसाठी , चोपडा तहसील कार्यालयात क्षेत्रिय अधिकाऱ्याची बैठक संपन्न . . . .

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         रावेर लोकसभा मतदार संघांसाठी , चोपडा तहसील कार्यालयात क्षेत्रिय अधिकाऱ्याची बैठक संपन्न . . . .

         लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यासाठी प्रशासनाने वेग घेतलेला आहे. याचाच एक भाग म्हणून चोपडा तहसील कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे तथा अति .सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन, निवडणूक प्रशिक्षक नरेंद्र सोनवणे, सर्व नोडल आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
            मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर देण्यासाठी ईव्हीएम मशीन ची सिलिंग सेटिंग प्रक्रिया प्रशासनाने यशस्वीपणे पार पाडली आहे. निवडणुकीदरम्यान चोपडा तालुक्यातील 136 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे तर यावल तालुक्यात 24 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले असून त्याद्वारे मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यानी मतदान केंद्रांची अंतिम तपासणी करून आवश्यक त्या सर्व सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रांवर कुलर, मंडप, पिण्याचे पाणी व्हिडिओग्राफी आधी आवश्यक बाबी पूर्ण असल्याची खात्री करावी.आदर्श मतदान केंद्र, महिलांसाठी खास पिंक बूथ, मी दिव्यांग मतदान केंद्रांवर सर्व मतदारांना विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन रोखीने मिळणार आहे. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत असे आवाहन क्षेत्रीय अधिकारी आणि उपस्थित तलाठ्यांना करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp