विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

14/05/2024

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश....

          चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित विवेकानंद  इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित शाळेचा दहावीच्या  परीक्षेचा निकाल बोर्डातर्फे जाहीर झाला असून यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. परंपरेनुसार या ही वर्षाचा निकाल 100% लागला असून दिप मनिष पारीख हा (92.4) गुण मिळवून विद्यालयात प्रथम, खुशी कल्पेश सुराणा (92.2) गुणांसह द्वितीय, प्रग्यान दर्शनकुमार जैन (91.2) तृतीय, केदार गोपाळ लोहार  (89.4) चतुर्थ, भूपेश  नितीन सैंदाणे (88.4) पाचवा क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

           यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री विकास यशवंत हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.श्री.विजय पोतदार, उपाध्यक्ष श्री. घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड श्री.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.श्री विनीत हरताळकर, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.नरेंद्र भावे, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्य सौ. सुरेखा मिस्त्री, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. माधवी भावे यांनी अभिनंदन केले. इ. दहावीच्या विद्यार्थ्यांना सौ. सुरेखा मिस्त्री, सौ.दिपाली चौधरी , घनश्याम पाटील, संजय गवळी, प्रवीण पाटील, प्रमोद पाटील  या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज