चोपडा (प्रतिनिधी) : - -
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
पुर्वी पवन अग्रवाल ही विद्यार्थिनी 94% गुण प्राप्त करून शाळेत प्रथम आली आहे. दिव्य हितेश जैन (91.6%), राजवीर प्रशांत पाटील (91.2%), स्पंदन उत्तम सोनकांबळे (90.4%), सेजल अजय कासट (87.4%), रोहित किशोर मराठे (87%), प्रियांशू खंडेराव पाटील (86.4%), मोहित भागवत पाटील (86.4%), मनीष भिकन शिरसाठ (86.2%), अक्षय संदिप पाटील (84.8%), देवांशू मनोज पाटील (83.8%), मंदाश्री चंद्रकांत पाटील (82.8%), हर्षदा प्रवीण बोरसे (80.4%), रिद्धिमा विजय सोनवणे (80.2%) या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सेक्रेटरी डॉ. स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, शाळा समन्वयक निळकंठ एस. सोनवणे, प्रा. दीनानाथ एस. पाटील आणि प्रा. विलास दारूंटे, मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती उपमुख्याध्यापक अमन पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. मोहित भागवत पाटील या विद्यार्थ्याने संस्कृत या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचा देखील विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल, दीप्ती पाटील, विशाखा बडगुजर, जगदीश पाटील, वैभव मराठे, विशाल मराठे, शकील अहमद, भूषण बडगुजर आणि दिपाली पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पुर्वी पवन अग्रवाल या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले तर पालक प्रतिनिधी म्हणून प्रा. उत्तम सोनकांबळे, प्रेमलता इंदरचंद टाटीया यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन अमन पटेल यांनी केले.
WhatsApp
No comments:
Post a Comment