" राजकिय कर्तृत्वांच्या प्रेरणाही ऊर्जा देतात " स्व. राजेश पायलटांच्या 24 व्या स्मृतीवंदनदिनी चंद्रशेखर पाटील यांचे प्रतिपादन ..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

11/06/2024

" राजकिय कर्तृत्वांच्या प्रेरणाही ऊर्जा देतात " स्व. राजेश पायलटांच्या 24 व्या स्मृतीवंदनदिनी चंद्रशेखर पाटील यांचे प्रतिपादन .....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          " राजकिय कर्तृत्वांच्या प्रेरणाही ऊर्जा देतात " स्व. राजेश पायलटांच्या 24 व्या स्मृतीवंदनदिनी चंद्रशेखर पाटील यांचे प्रतिपादन .....

        जोपर्यंत गरीब शेतकरी, मोलमजूरी करणाऱ्यांचे पाल्य शिकून त्या पदांवर पोहचणार नाही, जेथे देशाची नीती धोरणं ठरतात, तोपर्यंत देशाचा खऱ्या अर्थानं विकास होणार नाही या  विचारातून शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेत तसेच वायुसेनेत स्क्वाड्रन लिडर झालेले व ती  नोकरी सोडून राजकारणाची वाट धरीत, राजस्थानसह देशाच्या संसदेत आंतरिक सुरक्षा, दूरसंचार, भूतल परिवहन सारख्या विभागात मंत्रीपदं भूषवून आपल्या कार्य कर्तृत्वाची छाप पाडलेले लोकप्रिय किसान नेता ज्यांनी 11 जून 2000 ला जयपूर जवळ कार अपघातात प्राण गमावले त्या  स्व. राजेश पायलट यांचा 24 वा स्मृतिदिन चोपडा तालुका गुर्जर समाजातर्फे प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला .

          या वेळी ''स्व .पायलट यांची कार्य प्रेरणा आपल्या कृषी प्रधान तालुक्याला ऊर्जा देत राहिल" असे  प्रतिपादन करतांना समस्त दोडे गुर्जर संस्थान जळगावचे अध्यक्ष इंजि . चंद्रशेखर पाटील यांनी स्व. पायलट यांच्याशी एका कामांनिमित्त झालेल्या भेटीस उजाळा दिला. चोपडा गणेश कॉलनीतील कन्या विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. राजेश पायलट स्मृती वंदन कार्यक्रम प्रसंगी वरोल्लेखित मान्यवरांच्या हस्ते स्व. पायलट यांच्या प्रतिमेस माल्यार्पण तसेच दीपप्रज्वलन करून त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
            यावेळी सेवानिवृत मुख्या. विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी स्व. राजेश पायलट जीवन कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत कन्या विद्यालय नूतन इमारत उद्घाटन सोहळा निमंत्रण तसेच विधान सभा निवडणूक निमित्त काँग्रेस पक्षातर्फे अरुणभाई गुजराथींच्या प्रचारानिमित्त चोपडा येथे आले असताना गुर्जरदिशा मासिक प्रथम दिवाळी अंक प्रकाशनासाठी पायलट यांनी वेळ देत संस्थाध्यक्ष ॲड. जी. के. पाटील यांच्या घरी दिलेल्या भेट प्रसंगांस ऊजाळा देत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

          कार्यक्रमास जि. प. माजी सभापती दिलीप युवराज पाटील खर्डी, पं. स. माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, कृऊबा माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, कन्या विद्यालय उपाध्यक्ष सतीश पाटील, डी. बी. पाटील (जेडीसीसी चोपड़ा माजी व्यवस्थापक), बी. एन. पाटील सनपुले, लक्ष्मण पाटील चुंचाळे, कांतिलाल पाटील अजंतीसीम, अशोक जाधव कुरवेल इ. सह अनेक समाज बांधव उपस्थित होते .

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील सर तर आभार प्राथमिकचे मुख्या.गोपाल पाटील यांनी मानलेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज