दोन्ही मंत्री यांनी जाहीर केलेली कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे 4000 कोटी व गेल्या वर्षीचा खरिपाच्या पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळणे बाबत निवेदन.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

24/06/2024

दोन्ही मंत्री यांनी जाहीर केलेली कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे 4000 कोटी व गेल्या वर्षीचा खरिपाच्या पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळणे बाबत निवेदन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          दोन्ही मंत्री यांनी जाहीर केलेली  कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे 4000 कोटी व गेल्या वर्षीचा खरिपाच्या पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळणे बाबत निवेदन....

        लोकसभा निवडणुकी दरम्यान 25 एप्रिल रोजी जळगाव येथे  मा ना देवेन्द्र फडणवीस व मा.ना.धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यात  निवडणूक संपल्या संपल्या कापूस व सोयाबीन भावांतर योजनेसाठी 4000 कोटी शेतकऱ्यांचे खात्यावर टाकणार असल्याचे सांगितलं होते, ते मंजूर असून फक्त आचारसंहिता असल्याने निवडणूक संपली की लगेच वितरीत होणार असे देखील दोघेही मंत्री म्हणाले पण अद्याप सारे सामसूम दिसत आहे.आपण शब्दाला जागून ते लवकर टाकावे अन्यथा विधान सभा निवडणूक काळात प्रत्येक ठिकाणी शेतकरी आपणास अडवतील व विचारतील.

         तसेच जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी अवकाळी व अतिवृष्टी ने कापूस पिकांसह खरिपातील इतर पिकांचे नुकसान झाले होते. चोपडा तालुक्यात पावसाचा 21 दिवस खंड नसल्याने आगाऊ पीक विमा रक्कम मिळाली नाही पण पीक विमा मिलनेसाठी चे पीक कापणी प्रयोग झालेत त्यात चोपडा तालुक्यात खूप कमी उत्पन्न आल्याचे स्पष्ट अहवाल अधिकाऱ्यांनी दिले आहेत. म्हणजे उंबरठा उत्पन्न कमी आहे तरी देखील अजून पीकविमा अद्याप वाटप झाला नाही, त्याबाबत देखील तत्काळ सरकार पातळीवर आदेश व्हावेत.

          अश्या स्वरूपाचे निवेदन तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस बी पाटील, भागवत महाजन, डॉ रविंद्र निकम, डॉ सुभाष देसाई, अजित पाटील, कुलदीप राजपूत, प्रशांत पाटील, प्रमोद पाटील,अजय पाटील, प्रवीण पाटील, रफियोद्दिन पिंजारी, मन्साराम महाजन हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज