"वयाने ज्येष्ठ असाल तरी स्वतःला श्रेष्ठ म्हणू नका, नव्या पिढीशी जास्त वादविवाद घालू नका " ज्येष्ठ नागरिक संघ नूतन वास्तू उद्घाटन सोहळा प्रसंगी - अरुणभाई गुजराथी - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

24/06/2024

"वयाने ज्येष्ठ असाल तरी स्वतःला श्रेष्ठ म्हणू नका, नव्या पिढीशी जास्त वादविवाद घालू नका " ज्येष्ठ नागरिक संघ नूतन वास्तू उद्घाटन सोहळा प्रसंगी - अरुणभाई गुजराथी

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          "वयाने ज्येष्ठ असाल तरी स्वतःला श्रेष्ठ म्हणू नका, नव्या पिढीशी जास्त वादविवाद घालू नका " ज्येष्ठ नागरिक संघ नूतन वास्तू उद्घाटन सोहळा प्रसंगी - अरुणभाई गुजराथी

         ज्येष्ठांनी नव्या पिढीला जास्त सूचना - सल्ले न देता मुलाला सांगा तू माझा पालक तर नातूला सांगा तू माझा मार्गदर्शक आहे कारण आज संस्कार - संस्कृती बदलत आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या असंख्य समस्या, व्यथा, वेदना असल्यातरी त्यातून स्वतःला कसं सावरता येईल ते बघा. उर्वरित जीवन सहकार्याच्या भावनेने जगा, आपल्या आनंदाची संध्याकाळ होऊ देऊ नका, मला आनंदी जीवन जगायचंय ह्यादृष्टिने प्रयत्न करा असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ चोपडाच्या नारायण वाडीत उभारलेल्या नूतन वास्तू उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून आपले मनोगत मांडतांना प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा च्या कै. मगनलाल रामदास बडगुजर ( साळुंखे ) सभागृह या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना प्रा. अरुणभाई गुजराथी पुढे म्हणालेत की , बालपण हे आनंदाचे स्वप्न बघण्यासाठी, तारुण्य संघर्षाचा आनंद घेण्यासाठी तर म्हातारपण हे दुःख समस्यांसाठी असे काहीजण म्हणतात परंतु तसे न समजता उलट "ए कुदरत, तू आहिस्ते चल, कुछ कर्ज चुकाना - कुछ फर्ज निभाना और रोनेवालोंको हँसाना बाकी है " अश्या भावनेतून जगा असा विचार त्यांनी मांडला.

          उद्घाटक म्हणून आपले मनोगत मांडतांना ज्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात ज्येष्ठ नागरिक संघ चोपडाला खुला भूखंड लाभला ते तत्कालिन नगराध्यक्ष ॲड संदीप पाटील यांनी मुंबई येथील विश्वनाथ रामदास साळुंखे यांनी सभागृहाच्या वास्तूसाठी भावाच्या स्मृती प्रित्यर्थ 5 लाखाची देणगी देणं हे आजच्या काळाच्या दृष्टिने फार मोठे काम आहे असे गौरवोद्गार काढलेत तसेच मी उपस्थित मान्यवरांत सर्वात तरुण असल्याने सर्व ज्येष्ठांना मार्गदर्शन न करता फक्त त्यांनी सध्या दूरदर्शन वर ज्या सासू - सुनांच्या भांडणांच्या मालिका चालतात त्या बघणे टाळावे म्हणजे त्यांना मानसिक त्रास होणार नाही असे आवाहन करीत संघाच्या नूतन वास्तू उभारणी कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढलेत.

         यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या मनोगतातून माजी आमदार कैलास पाटील यांनी ही सध्या विविध कारणांमुळे होणाऱ्या आत्महत्या व पूर्वीची बदललेली परिस्थिती, दूरदर्शन चा विळखा याबाबत आपले विचार मांडतांना ज्येष्ठांच्या ज्ञान, अनुभवाचा तरुणांना लाभ व्हावा असे आवाहन केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित फेस्काम महाराष्ट्र चे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी यांनी चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाने आपली स्वत :ची सभागृह वास्तू उभी केली यात इति कर्तव्यता मानून थांबून न जाता वर या सभागृहा वर आपल्याला पुन्हा नवीन सभागृह बांधायचे आहे अशा उदिद्ष्टाने कार्यरत राहण्याची सूचना करतांना ज्येष्ठांनी आपल्या ज्ञान, अनुभव व वेळेचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले .
            तसेच फेस्काम खान्देश प्रादेशिक विभागाचे सचिव बी. एन. पाटील यांनी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत मांडतांना उपस्थितांना ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे फक्त गप्पा मारण्याचे ठिकाण नव्हे तर विचार विनिमय वाढावा, ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे नेमके काय ते समजून घेण्यासाठी संघात यावे असे आवाहन केले तसेच ज्येष्ठ नागरिक संघांच्या फेस्कामच्या कामांची माहिती देत खान्देशात सुरु असलेल्या फेस्कामच्या चांगल्या कामाची प्रशंसा केली.

           यावेळी व्यासपीठावर वरील मान्यवरांसह माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, संघाचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष रमण बाबुलाल गुजराथी, ॲड एस. डी. काबरे, जगतराव बारकू पाटील ( अध्यक्ष फेस्काम खान्देश प्रादेशिक विभाग ), बंधूच्या स्मरणार्थ संघाच्या वास्तू उभारणी साठी 5 लाखाची भरीव मदत देणारे विश्वनाथ रामदास साळुंखे (मुंबई ), प्रा एस. बी. महाजन ( संघटक फेस्काम जळगाव जिल्हा ) , विश्वनाथ सीताराम अग्रवाल ( उदयोजक ), जळगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे धांडे व ॲड. मोते, अरुण कुमार माळी ( फेस्काम जिल्हा संघटक पश्चिम ) संघाचे विद्यमान अध्यक्ष व्ही .एच करोडपती इ मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी रमण गुजराथी, ॲड एस डी काबरे, इंजि. गुजराथी, सुरेश पाटील, महेश शर्मा यांचे विशेष सहकार्याबद्दल सत्कार तसेच वास्तू उभारणीत रु 25 हजाराच्या देणगी देणाऱ्यां प्रति संघातर्फे त्यांच्या नामोल्लेखांसह कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडाच्या सुंदर सभागृहाच्या वास्तूची , स्वतंत्र कार्यालयाची, भितींच्या कुंपणाची तसेच खुल्या व्यायाम शाळेची उभारणी करून विद्यमान संघ कार्यकारिणीने केलेल्या चांगल्या कार्याचा गौरव म्हणून उपस्थित मान्यवरांनी संघाध्यक्ष विजय करोडपती व पदाधिकारी कार्य सदस्यांचा यथोचित सत्कार केला.

          उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाध्यक्ष व्ही. एच. करोडपती यांनी, सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्या. विलास पी. पाटील खेडीभोकरी कर तर आभार कार्य. सदस्य प्रा. श्याम गुजराथी यांनी मानलेत. कार्य. सदस्य जे. एस. नेरपगारे यांनी गायलेल्या पसायदानाने व सुरुची भोजनाने सदस्यांच्या भरगच्च उपस्थितीने संपन्न झालेल्या कार्यक्रमाची सांगता झाली .

          कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघाचे उपाध्यक्ष एम. डब्ल्यू. पाटील, सचिव प्रमोद डोंगरे, सहसचिव एन. डी. महाजन कोषाध्यक्ष सुभाष यादवराव पाटील, कार्य सदस्य श्याम गुजराथी, मधुकर विठ्ठल बाविस्कर, दिलीपराव माधवराव पाटील, गोविंदा बापू महाजन, जयदेव निंबा देशमुख, जे. एस. नेरपगारे इ. नी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज