Post Top Ad
Responsive Ads Here
23/06/2024

Home
Unlabelled
तावसे येथील भल्यामोठ्या अजगरास सर्पमित्राने दिले जीवदान . . . .
तावसे येथील भल्यामोठ्या अजगरास सर्पमित्राने दिले जीवदान . . . .
भारतीय अजगर (Indian python) : हा अजगर भारतीय उपखंड तसेच आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. याला इंडियन रॉक पायथॉन (Indian rock python) किंवा एशियन रॉक पायथॉन (Asian rock python) असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव पायथॉन मोलुरस (Python molurus) असून अजगरांची पायथॉन ही एक मोठी प्रजाती आहे. याचा रंगमातकट किंवा फिकट पिवळसर असून त्यावर गडद तपकिरी रंगाचे साधारण वेडेवाकडे चौकोनी आकाराचे ठिपके असतात. सामान्यपणे याची लांबी सु. 3 मी.पर्यंत असते ; परंतु, सु. 6-7 मी. लांब असलेले भारतीय अजगर आढळले आहेत. डोक्यावर दोन्ही बाजूंनी निघणाऱ्या फिकट पिवळसर रंगाच्या जाड रेषा नाकावर एकत्र येतात. बाणाच्या टोकाप्रमाणे याचा आकार दिसतो. हे अजगर सहसा पाण्याच्या ठिकाणी आढळून येतात. त्यांना उत्तम पोहता येते. 2010 – 2020 या दशकामध्ये अधिशोषण, अधिवास नष्ट होणे आणि अपुरे संवर्धन यांमुळे भारतीय अजगरांची संख्या सुमारे 30% इतकी कमी झाल्याची आढळून आली. त्यामुळे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने नजीकच्या काळात ही जाती धोक्यात येऊ शकते (Near threatened) असे जाहीर केले आहे. याचे आयुर्मान सुमारे 30 वर्षे असते. @ सर्पमित्रास संपर्क करण्याचे आवाहन @ पावसाळा ऋतूमध्ये विविध प्रकारचे विषारी व बिनविषारी सापांचा वावर व आढळ जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे शेतकरी व मजूर बांधव तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी. तालुक्यात कुठेही साप आढळल्यास साप सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी 9049670713 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सर्पमित्र श्री कल्पेश सूर्यवंशी, पक्षी व वन्यजीव अभ्यासक श्री हेमराज पाटील ( प्रमुख मार्गदर्शक , सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था , चोपडा ) यांनी केले आहे.
Share This

About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here
No comments:
Post a Comment