चोपडा येथील संशयित लाचखोर अधिकारी एम. एस. ई. बी. चा सहाय्यक अभियंता अमित सुलक्षणे एसीबीच्या सापळ्यात..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

12/03/2025

चोपडा येथील संशयित लाचखोर अधिकारी एम. एस. ई. बी. चा सहाय्यक अभियंता अमित सुलक्षणे एसीबीच्या सापळ्यात.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपडा येथील संशयित लाचखोर अधिकारी एम. एस. ई. बी. चा सहाय्यक अभियंता अमित सुलक्षणे एसीबीच्या सापळ्यात.....

          नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने 5500/- रुपयांची लाच मागितली होती. अखेर तडजोडी अंती 4500/- रुपयांची लाच स्विकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अमित दिलीप सुलक्षणे (वय 35 वर्षे, रा. प्लॉट.नं. 60 बोरोले नगर 1 चोपडा) असे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संशयित लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे , नवीन वीज मीटर बसविण्यासाठी 5500/- मागणी केली. तडजोडी अंती 4500/- रुपये देण्याचे ठरले. यानंतर आज दिनांक 12 मार्च रोजी 4500/- रुपये स्विकारताना संशयीत लाचखोर अधिकारी श्री सुलक्षणे यास रंगेहाथ पकडण्यात आले.

         याबाबत सविस्तर असे की चोपडा तालुक्यातील तक्रारदार यांच्या घरी नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी सहायक अभियंता अमित सुलक्षणे (चोपडा शहर कक्ष 2) यांनी 5500/- रुपयांची मागणी केली आणि तडजोड अंती 4500/- रुपये घेण्याचे ठरले होते. 

         यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि सहायक अभियंता अमित सुलक्षणे यांस साडेचार हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पो ना मराठे, पो ना राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज