चापटाबुक्यांसह लोखंडी फावड्याने मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी ; धरणगाव पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल.. - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

22/06/2024

चापटाबुक्यांसह लोखंडी फावड्याने मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी ; धरणगाव पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल..


 धरणगाव (प्रतिनिधी) : - -

         चापटाबुक्यांसह लोखंडी फावड्याने मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी ; धरणगाव पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल.. 

          धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील शेतकरी रमेश झावरू पाटील यांच्या सह मुलगा किरण पाटील यास मारहाण करून डोक्यात फावडा मारून जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत धमकी दिल्या प्रकरणी धनराज चौधरी यांच्या विरुद्ध धरणगाव पो. स्टे. ला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

         पोलिसांच्या माहिती वरून झुरखेडा गावाकडून दुसखेडा गावाकडे जाणाऱ्या शेत रस्त्यावर धनराज चौधरी हे त्यांच्या चुलत भावाच्या शेतात रस्त्याला लागून चारी खोदत असतांना रमेश पाटील यांनी धनराज चौधरी यांना समजवण्याचा प्रयत्न केला  की, आपण रस्त्यालगत चारी कोरू नये पण धनराज चौधरी यांनी रमेश पाटील यांचे न एकता तुझ्या काय बापाचे शेत आहे का हे असे म्हणत दोघात वाद निर्माण झाला.
             त्यानंतर धनराज चौधरी ने रमेश पाटील यांच्या कपाळावर लोखंडी पावडी घेवुन मारहाण करत त्यांना जबर जखमी केले त्याचवेळी रमेश पाटील यांचा मुलगा किरण त्याठिकाणी वडिलांच्या बचावा करिता आला असता त्याला देखील धनराज चौधरी याने शिवीगाळ करत चापट बुक्याने मारहांन केली  तुम्हा दोघाना जीवेठार मारून टाकू अशी धमकी दिली व तुमचे अजून किती लोक आहेत त्यांना देखील घेऊन ये अशी देखील धमकी दिली यावेळी रमेश पाटील यांच्या कपाळातुन मोठ्याप्रमाणात रक्त स्राव होत असल्यामुळे ते घरी निघाले.

          तेव्हा रस्त्यात गावातील लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील, गावातील शेतकरी दिपक चौधरी व शांताराम पाटील यांनी त्यांना धरणगांव पोलीस स्टेशनला आणले असता तेव्हा पोलीसांनी रमेश झावरु पाटील यांना उपचाराकरीता मेमो दिल्याने ते लागलीच ते ग्रामीण रुग्णालय धरणगांव येथे जावुन त्यांनी उपचार घेतला.

         तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला व त्यांना सांगितले की, तुम्हाला नऊ टाके टाकले आहेत आता पुढील उपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल जळगांव येथे तुम्हाला जाणे आवश्यक आहे असे  सांगुन ट्रान्सफर मेमो दिल्याने ते पुढील उपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल जळगांव येथे जावुन उपचार करुन आज रोजी धरणगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते धनराज नवल चौधरी रा झुरखेडा ता धरणगाव याचे विरुध्द कायदेशीर फिर्यादीचा विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढील तपास धरणगाव पो. स्टे. चे पो. नि. व पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज