चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाची नूतन कार्यकारिणी बिनविरोध ; अध्यक्षपदी - जयदेव देशमुख , सचिव - विलास पाटील - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

20/07/2024

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाची नूतन कार्यकारिणी बिनविरोध ; अध्यक्षपदी - जयदेव देशमुख , सचिव - विलास पाटील

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाची नूतन कार्यकारिणी बिनविरोध ; अध्यक्षपदी - जयदेव देशमुख , सचिव - विलास पाटील

        चोपडा येथे गेल्या 32 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. त्यात येत्या 2 वर्षांसाठी सर्वानुमते नूतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यात अध्यक्षपदी जयदेव देशमुख , उपाध्यक्ष - जीजाबराव एस्. नेरपगारे , सचिव - विलास पी. पाटील खेडीभोकरीकर , सहसचिव - इंजि. व्ही. एस. पाटील , कोषाध्यक्ष - दिलीपराव पाटील तसेच कार्यकारिणी सदस्य - रमण बाबुलाल गुजराथी, एम. डब्ल्यू. पाटील, प्रा. श्यामभाई  गुजराथी, गोविंदा महाजन, राजेंद्र साळुंखे, स्त्री सदस्या - श्रीमती शकुंतला गुजराथी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
             या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानी मावळते अध्यक्ष व्ही. एच. करोडपती होते. तसेच सचिव - प्रमोद डोंगरे, सहसचिव - एन. डी. महाजन, कोषाध्यक्ष - सुभाष पाटील यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज सांभाळले. यावेळी रमण गुजराथी, एम.डब्ल्यू. पाटील, मधुकर बाविस्कर या कार्यकारिणी सदस्यांसह इतर आजीव सदस्य उपस्थित होते.

        या वेळी ज्येष्ठ सदस्य प्रमोद मोरे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या नेत्र रोग तपासणी शिबीराच्या आयोजनास सर्वतोपरी मदत करण्याचे घोषित केले. सुरुची भोजनाने सर्वसाधारण सभेची सांगता झाली. नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज