ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम शाळेतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/06/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम शाळेतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम शाळेतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन

         महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स  कॉलेज कॅम्पस, यावल रोड, चोपडा येथे लर्निंग आउटकम्स आणि अध्यापनशास्त्र या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांच्या ईशस्तवनाने करण्यात आली.

        नाशिक येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल डॉ. मनोहर महाजन यांनी चोपडा तालुक्यातील ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल तसेच अमळनेर तालुक्यातील  शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले. केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ दिल्ली आयोजित या प्रशिक्षणासाठी शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक विजय पाटील, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे, विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री, डॉ. दादासाहेब सुरेश जी पाटील आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी उपस्थित होते.

          प्रशिक्षणाच्या अनुषंगाने प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन पटेल आणि कल्पना बारी यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली गायकवाड यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp