शिक्षण संस्थाचालकांचे व सर्व शिक्षक संघटनाचे मुख्यमंत्री यांना समस्यांचे निवेदन सादर.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

23/06/2024

शिक्षण संस्थाचालकांचे व सर्व शिक्षक संघटनाचे मुख्यमंत्री यांना समस्यांचे निवेदन सादर....

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

         शिक्षण संस्थाचालकांचे व सर्व शिक्षक संघटनाचे मुख्यमंत्री यांना समस्यांचे निवेदन सादर....

          महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने दि. 22 रोजी आदित्य लॉन्स जळगाव येथे आले असता नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीमध्ये जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना, जिल्हा शैक्षणिक समन्वय समिती तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्था चालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख समस्यांच्या मागणीचे निवेदन मा मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आले.त्यात संस्था चालकांच्या खालील मागण्या तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न निवेदनातून मांडण्यात आले या मागण्याविषयी अधिवेशनाच्या काळात सकारात्मक निर्णय घेऊ, शिक्षण संस्था संस्थेचे प्रश्न सोडवले जातील व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा ही निर्णय घेतला जाईल असे आश्वासित केले गेले.

                   @  प्रमुख मागण्या  @

1) खाजगी शिक्षण संस्थांना दिले जाणारे पाच टक्के वेतनेतर अनुदान अतिशय अल्पशा असून मा मेहरबान हायकोर्टाने जे वेतनेतर अनुदान वाढवून देण्याविषयी न्यायालयीन निर्णय शासनाला दिलेला आहे त्या न्यायालयिन निर्णयाला अधीन राहून आपण वाढीव वेतनेतर अनुदान द्यावे.

2) खाजगी शिक्षण संस्था चालकांच्या थकीत इमारती भाड्यांच्या विषयी तात्काळ निर्णय व्हावा संस्था चालकांना शालेय भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष अनुदान द्यावे.

3) खाजगी शिक्षण संस्था चालकांना विजेचे बिल आकारात असताना ते व्यापारी तत्वावर न अंगीकारता त्यात विशेष सवलत द्यावी त्याचबरोबर शाळा व महाविद्यालयांसाठी नगरपालिका नगरपंचायतीकडून तो कर आकारला जातो त्यात सूट देण्यात यावी.

4) शिक्षक भरती करीत असताना पवित्र पोर्टलची अंमलबजावणी करताना संस्थाचालकांच्या अधिकाराला पूर्वत संरक्षण द्यावे एका जागेसाठी दहा लोकांना 1:10 चे प्रमाण मान्य करावे तसेच शिक्षक व शिक्षकेतरांची भरती वरील बंदी उठवून ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने न भरता सरळ सेवा पद्धतीने भरावी

5) 2005 नंतरच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

          यात संस्था चालकांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील , करीम सालार , संजय गरुड तसेच शिक्षण समन्वयक समितीचे यु यु पाटील , शिक्षक नेते एस डी भिरूड सर , अप्पा साहेब संभाजी पाटील , प्रा शैलेश राणे , प्रा सुनील गरुड यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज