" रोटा किड्सनी रोटरीचा मैत्री आणि सेवा संस्कार जोपासत भविष्यात मोठे व्हावे " रोटा किड्स पदग्रहण सोहळा प्रसंगी आशिष गुजराथी यांचे प्रतिपादन - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

15/07/2024

" रोटा किड्सनी रोटरीचा मैत्री आणि सेवा संस्कार जोपासत भविष्यात मोठे व्हावे " रोटा किड्स पदग्रहण सोहळा प्रसंगी आशिष गुजराथी यांचे प्रतिपादन

 
रोटा किड्स चोपडा - सिया अग्रवाल (नात श्री. संतोष उर्फ दगडूशेठ अग्रवाल - विरवाडेकर) कडून नूतन अध्यक्ष पदभार स्वीकारतांना - आरोही पाटील (नात - ॲड. डी.पी.बापू खेडीभोकरीकर)
चोपडा (प्रतिनिधी) : - -

          " रोटा किड्सनी रोटरीचा मैत्री आणि सेवा संस्कार जोपासत भविष्यात मोठे व्हावे " रोटा किड्स पदग्रहण सोहळा प्रसंगी आशिष गुजराथी यांचे प्रतिपादन 

          शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात सादर होणारी नृत्य किती समाजभान आणि आत्मभान जपणारी असतात? नृत्य सादर करणाऱ्या मुला-मुलींच्या वयाला आणि त्यांना असणाऱ्या समजेला साजेशी असतात का ? याचे भान पालकांनी ठेवले पाहिजे. टाय, बूट, क्लास, प्रोजेक्ट यामध्ये मुलांचं बालपण हरवत चाललं आहे . मुलांना खरं जगू दिलं पाहिजे. पालकांनी मुलांना मुक्तपणे खेळू दिले पाहिजे, मातीशी त्यांची नाळ जुळली पाहिजे. मुलांमध्ये प्रचंड शक्ती आणि उत्साह आहे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांचे सामाजिक भान जागवणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे. रोटा किड्स सारख्या संस्थांमधून मुलांवर सेवेचे संस्कार होत असतात असे अमळनेर येथील रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी मुलांशी व पालकांशी संवाद साधताना सांगितले. 

         शहरातील रोटरी भवन येथे झालेल्या रोटरीच्या ७ ते १२ वयो गटातील बालकांच्या रोटा किड्सच्या शाखा पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर चोपडा रोटा किड्सची नूतन अध्यक्ष आरोही पाटील, सचिव रुचिता वाघ , दर्श पोतदार , कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष गुजराथी , प्रमुख अतिथी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी , रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे सहसचिव रोटे. नितीन अहिरराव , रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष प्रा. डॉ . ईश्वर सौंदाणकर , सचिव भालचंद्र पवार , रोटरी माजी अध्यक्ष एम. डब्ल्यू. पाटील , प्रसन्न गुजराथी , व्ही. एस. पाटील , विलास पाटील , ॲड. रुपेश पाटील , माजी पं. स. सभापती ॲड. डी. पी. पाटील , कवी अशोक सोनवणे , दगडूशेठ अग्रवाल , इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष वैशाली सौंदाणकर, सचिव पूनम गुजराथी हे उपस्थित होते.
            याप्रसंगी नितीन अहिरराव, ईश्वर सौंदाणकर, अरुणभाई गुजराथी यांनी मनोगते व्यक्त केली. तर कवी अशोक सोनवणे यांनी मुलांसाठीची एक कविता सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना गोष्टींच्या माध्यमातून रोटरीचा सेवा आणि मैत्रीचा संस्कार जोपासत आयुष्यात मोठे होण्याचा सल्ला दिला.

         तत्पूर्वी रोटा किड्सची मावळती अध्यक्ष सिया अग्रवाल , सचिव रिद्धी जैन , कोषाध्यक्ष आश्का गुजराथी यांनी अनुक्रमे नूतन अध्यक्ष आरोही पाटील , सचिव रुचिता वाघ , कोषाध्यक्ष दर्श पोतदार यांच्याकडे पदभार सोपवला. सिया अग्रवाल हिने मागील वर्षाचा अहवाल व रिद्धी जैन हिने जमाखर्च मांडला तर नूतन अध्यक्ष आरोही पाटील हिने नवीन वर्षात करावयाचे उपक्रम उपस्थितांसमोर मांडले. या सोहळयात सानवी देशमुख व कार्तिक पाटील यांनी नृत्य सादर केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन आरव गुजराथी व विशी अग्रवाल यांनी , आभार प्रदर्शन रुचिता वाघ हिने तर सोहळा यशस्वी करणे साठी रोटा किड्स चोपडाचे पालक प्रसन्न गुजराथी व सेवा निवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील, इंजि.व्ही.एस्.पाटील यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज