शुल्क नियामक प्राधिकरणाचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पध्दतीने चालवा, शुल्क निर्धारणसाठी संस्थांनी खोटी माहिती सादर केल्यास कडक कारवाई करणार - - श्री. विजय आचलिया यांचे आश्वासन. - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

14/07/2024

शुल्क नियामक प्राधिकरणाचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पध्दतीने चालवा, शुल्क निर्धारणसाठी संस्थांनी खोटी माहिती सादर केल्यास कडक कारवाई करणार - - श्री. विजय आचलिया यांचे आश्वासन.

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          शुल्क नियामक प्राधिकरणाचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पध्दतीने चालवा, शुल्क निर्धारणसाठी संस्थांनी खोटी माहिती सादर केल्यास कडक कारवाई करणार - - श्री. विजय आचलिया यांचे आश्वासन. 

          व्यवसायीक महाविद्यालयाचे शैक्षणीक शुल्क निर्धारण करणार्या शुल्क नियामक प्राधिकरणाचा कारभार हा अत्यंत बेजबाबदार पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थी, पालक व समाज यांच्यावर दुरगामी परिणाम करणाऱ्या शुल्क नियामक प्राधिकरणाचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पध्दतीने चालवा ह्या साठी टॅफनॅप, मुक्ता,सारती व इतर समविचारी संघटना यांनी संयुक्तपणे व्यापक अभियान सुरू केले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून मंगळवार दि. 9 जुलै 2024 रोजी ह्या संघटनांच्या प्रतिनिधींनी शुल्क नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्ष व इतर पदाधिकार्यांचीं भेट घेऊन एक निवेदन सादर केले.

         शैक्षणिक शुल्क निश्चित करीत असतांना संस्थाकडून घेण्यात याणारे शपथपत्र, शुल्क निश्चिती साठी प्राधिकरणा तर्फे करण्यात आलेले नियम, माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी ह्या सर्वांचीं अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. ह्यावर सर्व उपस्थितांचे एक मत झाले. संस्थेने दिलेल्या शपथपत्रा नुसार सन 2024-25 साठी ज्या संस्थांचे शिक्षण शुल्क ठरविण्यात आले आहे अश्या संस्थांना तत्काळ शैक्षणीक शुल्क निर्धारणाचा पूर्ण प्रस्ताव सर्व प्रपत्रांसह संबंधित काॅलेजच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात यावा व ज्या संस्थांचे शुल्क अद्याप ठरविण्यात आलेले नाही अशा संस्थांनी शुल्क निर्धारणाचा पूर्ण प्रस्ताव वेबसाईटवर उपलब्ध केल्या शिवाय त्यांचे शुल्क निर्धारण करण्यात येऊ नये. ह्या साठी कारवाई करण्याचे मान्य करण्यात आले.
          शुल्क नियामक प्राधिकरणाकडे संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मान्यताप्राप्त कर्मचार्याच्या बाबत दिलेली माहिती पडताळून पाहण्यासाठी सध्या ठोस यंत्रणा नाही. अपुर्या कर्मचारी संख्येमुळे ही पडताळणी करणे अवघड आहे. ह्या साठी संघटनातरफे Controlling Authorities म्हणजे AICTE / DTE यांचे कडे पाठपुरावा करावा अशी सुचना करण्यात आली. प्राधिकरणातर्फे भविष्यात वापरण्यात येणाऱ्या आधुनिक संगणक प्रणाली मध्ये ही माहिती पडताळून पाहण्या साठी योग्य ती तरतुद करण्यात येईल. असे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले. विद्यार्थी, पालक व सामान्य जनता यांच्या दृष्टीने माहिती शुल्क नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर देण्यात येणारी माहिती ही अत्यंत महत्वाची असते. तथापि प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर बर्याच महत्वाच्या गोष्टींचीं माहिती उपलब्ध नाही. अथवा दिलेली माहिती अपुरी आहे. ह्या मध्ये तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगण्यात आले.

          माहिती अधिकार कायदा कलम 4 ( 1) बी च्या तरतुदीनुसार शुल्क नियामक प्राधिकरणाने 17 अनिवार्य बाबिंची माहिती त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करणे अनिवार्य आहे. तथापि या 17 अनिवार्य बाबिंन पैकी एकाही अनिवार्य बाबींची माहिती शुल्क नियामक प्राधिकरणाच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ह्या बाबत त्वरीत कारवाई करून ही त्रुटी दुर करण्यात येईल असे सांगण्यात आले.
          संघटनेच्या प्रतिनिधी तर्फे संस्थाकडून करण्यात आलेल्या गैरव्यवहारांचे पुरावे सादर करण्यात आले. ह्या बाबत वेगळी बैठक घेऊन संघटनातर्फे सादर करण्यात आलेल्या माहितीची सत्यता पडताळून संबंधित संस्था, प्राचायॅ अथवा संस्थाचालक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी दिले.

         भविष्यकाळात अश्याच प्रकारे संघटनांचे प्रतिनिधी व शुल्क नियामक प्राधिकरणाचे कामकाज पारदर्शक पध्दतीने पार पाडले जाईल या बाबत सर्व संबंधितांनीं विश्वास व्यक्त केला. ह्या बैठकीसाठी टॅफनॅप चे सचिव प्रा. श्रीधर वैद्य, मुक्ता संघटनेचे महासचिव प्रा. डाॅ. सुभाष आठवले, प्रा. राम यादव, प्रा. वाघमारे, प्रा.सचिन शिंदे, प्रा. शंतनु काळे, व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज