विवेकानंद विद्यालय चोपडा आयोजित पुस्तक मैत्री शिबीर संपन्न ... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

31/07/2024

विवेकानंद विद्यालय चोपडा आयोजित पुस्तक मैत्री शिबीर संपन्न ...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           विवेकानंद विद्यालय चोपडा आयोजित पुस्तक मैत्री शिबीर संपन्न ...

       वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा | इतिहासाचा, साहित्याचा आणिक विज्ञानाचा ||

          वाचनाची महती समर्पक शब्दांत सांगणाऱ्या या काव्यपंक्ती. वाचन संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा व वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने  विवेकानंद विद्यालयात इ. सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मैत्री शिबीर संपन्न झाले. आई शारदादेवी, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे व ग्रंथपूजनाने शिबीराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डाॅ विकास हरताळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डाॅ विनीत हरताळकर, श्री. विलास पाटील (खेडीभोकरीकर), मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे, श्री.पवन लाठी, श्रीमती शितल पाटील आदी मान्यवर  उपस्थित होते.

        शिबिराचे आयोजक  श्री. संजय सोनवणे सर यांनी प्रयोजन स्पष्ट केले. मुख्या. श्री. नरेंद्र भावे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डाॅ. विकास हरताळकर यांनी शिबिरासाठी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यातर्फे पुस्तकं भेट दिले.  

         सकाळच्या सदरात 'पुस्तक वाचनाचे फायदे' यावर श्री. विलास पाटील (माजी. मुख्या. तांदळवाडी हायस्कूल), 'मी वाचलेली पुस्तके' यावर श्री. राधेश्याम पाटील यांनी, तर 'इतिहास माझा ठेवा' यावर श्री. पंकज शिंदे (प्र.वि.मं.चोपडा) यांनी मार्गदर्शन केले. पुस्तकाचे  कवी किंवा लेखक कोण हे  खेळाद्वारे श्री.अभिषेक शुक्ल यांनी घेतले. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. दुपारच्या सत्रात 'चला करुया पुस्तकांशी मैत्री - चला जाऊया पुस्तकांच्या नगरीत' या खेळातून श्री. संजय सोनवणे यांनी प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तकं देऊन खेळीमेळीच्या वातावरणात वाचन करून घेतले.

         कविता गाणी शिकवती आम्हां हा विषय घेऊन आणि मराठीच्या पाठयपुस्तकातील धड्यांचे कवी व लेखक यांना स्मार्ट टी.व्हीच्या पॅनलवर भेटीला आणून प्रसाद वैद्य यांनी मार्गदर्शन केले, माझा जन्म लेखक व कविच्या हातात हा जोडी शोधा खेळ श्री. मांगीलाल बारेला यांनी घेतला, तर Motivational Song With Dance - मै तैयार हू | या गीतावर श्री. राकेश विसपुते यांनी मुलांच्या हातात पुस्तके देऊन नृत्य घेतले. शिबिराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे वळणार असा संकल्प घेऊन आपले मनोगत व्यक्त केले.

          या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त डाॅ.अमित हरताळकर, सौ. ज्योस्ना हरताळकर, श्री विलास पाटील, श्री नरेंद्र भावे, श्रीमती आशा चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी हे शिबीर आयोजित केल्याबदल पालकांनी विवेकानंद परिवाराचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज