महसूल विभामार्फत राज्यात महसूल दिन , दिनांक 1ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा होणार..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

01/08/2024

महसूल विभामार्फत राज्यात महसूल दिन , दिनांक 1ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा होणार.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          महसूल विभामार्फत राज्यात महसूल दिन दिनांक 1ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा होणार.....

         महसूल विभामार्फत राज्यात महसूल दिन दिनांक 1 ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा 2024 साजरा करणेबाबत शासनाने 30 जुलै 2014 रोजी आदेश दिला आहे. महसूल विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जनतेला / नागरीकांना अधिका अधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच नागरिकांमध्ये जागरुकता वाढून शासनाबाबत विश्वासव्दीगुणोत व्हावा यासाठी विशेष मोहीत लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने 1ऑगस्ट रोजी महसूल दिन राबविण्यात येत असतो या वर्षापासून महसूल दिन 1ऑगस्ट ते 15 ऑगस्ट महसूल पंधरवाडा 2024 आयोजित करण्यात आला आहे.
           आज 1 ऑगस्ट रोजी महसूल पंधरवाडा चे शुभारंभ तहसिल कार्यालय चोपडा येथे सकाळी 12 वाजता तालुक्याचे आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्याक्रमास तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ महसूल कर्मचारी व सामाजीक कार्यकर्ते आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शासनामार्फत राबविण्यात योजनाच्या तहसिल कार्यालय स्तरावून देण्यात आलेले लाभाथर्थी यांना प्रतिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात आलेला आहे. 1) संजय गांधी निराधार इंदिरा गांधी निराधार योजनेचे एकूण 552 प्रकरणे मंजूर करण्यात आली. 2) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले. 3) 7/12 उतारे व फेरफार संगणकीकृत वितरण करण्यात आले. 4) निवडणूक ओळखपत्र वितरीत करण्यात आले. 5) महसुल कलम 43 कमी केले वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करुन 7/12 वितरीत केले. 6) E. शिधापत्रिका वाटप करण्यात आले. 7) जातीचे दाखले वितरित करण्यात आले. 8) PM किसान योजना 
         सदर कार्याक्रमास तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले, गटविकास अधिकारी आर ओ वाघ, नगर पालिका मुख्याधिकारी राहूल पाटील उपस्थित होते. तसेच निवडणूक नायब तहसिलदार सचिन बांबळे, निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, महसूल नायब तहसिलदार आर आर महाजन व सर्व कार्यालयीन कर्मचारी, सर्व तलाठी कर्मचारी ग्रामसेवक उपस्थित होते. 

         # महसुल पंधरवाडा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट खालील प्रमाणे पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. #            @  कार्यक्रमाची रूपरेषा  @

        दिनांक 1 ऑगस्ट - महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवडा शुभारंभ मुख्यमंत्री-माझी लड़की बहीन योजना.

       2 ऑगस्ट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

      3 ऑगस्ट मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

      4 स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय 

      5 ऑगस्ट कृषि मार्गदर्शन कार्यक्रम

      6 ऑगस्ट शेती पाऊस आणि दाखले 

      7 ऑगस्ट युवा संवाद

      8 ऑगस्ट महसूल जन संवाद

      9 ऑगस्ट महसूल इ. प्रणाली 

     10 ऑगस्ट सैनिक हो तुमच्यासाठी 

     11 ऑगस्ट आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन

     12 ऑगस्ट एक हात मदतीचा - दिव्यांच्या कल्याणाचा 

      13 ऑगस्ट महसूल अधिकारी / कर्मचारी यांचे प्रशिक्षण 

     14 ऑगस्ट महसूल पंधरवडा वार्तालाप 

      15 ऑगस्ट महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभ.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज