चोपडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सप्ताह आयोजन..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

27/07/2024

चोपडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सप्ताह आयोजन.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सप्ताह आयोजन.....

         चोपडा येथे श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून दि. 30/7/2024 मंगळवार रोजी श्री संत सावता महाराज प्रतिमेची माळी समाज मंगल कार्यालयात स्थापना करून कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याचबरोबर दि. 30/7/24 रोजी ह भ प भानुदास महाराज भुसावलकर, दि. 31/7/24 रोजी ह भ प ज्ञानेश्वर महाराज पुनगावकर, दि. 1/8/24रोजी ह भ प महेश महाराज चिखलीकर ह.मु. एकलग्न दि. 2/8/24रोजी ह भ प गजानन महाराज पारोळेकर, दि. 3/8/24 रोजी सकाळी काल्याचे किर्तन ह भ प योगेश महाराज वाघाडीकर या सर्व महाराजांचे कीर्तन आपल्या सर्वांना लाभ मिळणार आहे त्याचबरोबर दैनंदिन 5 ते 6 वाजता काकड आरती होणार असून त्याचबरोबर संध्याकाळी हरिपाठ होणार आहे. 

         तसेच शेवटच्या दिवशी  दि 3/8/2024 रोजी सात ते आठ हजार भाविक भक्तगण सर्व समाज बांधव साठी  महाप्रसादाचा आयोजन केले आहे त्याचबरोबर संध्याकाळी पालखी मिरवणूक शहरातून निघणार आहे, तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी श्रवणाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा अशी समस्त फुलमाळी समाज पंच मंडळ व समस्त फुल माळी समाज बांधव च्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे.







No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज