श्री संत सावता माळी युवक संघ व S महाराष्ट्र 7 न्युज च्या पाठपुराव्याला यश ; महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेला फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/07/2024

श्री संत सावता माळी युवक संघ व S महाराष्ट्र 7 न्युज च्या पाठपुराव्याला यश ; महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेला फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

             श्री संत सावता माळी युवक संघ व S महाराष्ट्र 7 न्युज च्या पाठपुराव्याला यश ; महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेला फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ

        या वर्षी इयत्ता 10 वी परीक्षा पास OBC , VJNT , NT C आणि SBC विद्यार्थ्यांसाठी JEE / NEET / MH-CET चे मोफत आॅनलाईन प्रशिक्षण , शिवाय मोफत 8 इंची टॅब , आणि दररोजचा 6 GB इंटरनेट डेटा मोफत ! ! !

         महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. या महाज्योतीच्या वतीने , या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेला आहे व जे विद्यार्थी 12 वी नंतर इंजिनियरींग मेडीकल मधे प्रवेश घेण्यासाठी 2026 ची JEE / NEET व MH-CET ची स्पर्धा परीक्षा देवु इच्छितात परंतु त्यासाठी लाखो रूपयाचे महागडे कोचिंग क्लास लावु शकत नाही. अशा OBC , VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी , महाज्योतीच्या वतीने मोफत आॅनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

         त्यासाठी या विषयातले अत्यंत तज्ञ प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रशिक्षण देईल. आॅनलाईन प्रशिक्षण देत असतांना ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यां जवळ चांगले किंवा मोबाईल नसतात. ही गरज लक्षात घेवुन , महाज्योती अशा सर्व विद्यार्थ्यांना अगदी मोफत टॅब देत आहे. या शिवाय या टॅब सोबतच दर दिवशी 6 GB इंटरनेट डेटा सुध्दा आॅनलाईन क्लास पहाता यावा , म्हणुन अगदी मोफत देत आहे. ते पुढील शिक्षणासाठीही त्यांना कामी येतील. तसेच या JEE / NEET / MH-CET स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत घरपोच दिली जातील.

         यासाठी विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जावुन , तिथे JEE या नोटीस बोर्डवरील जागेवर क्लीक करावे. त्यावर पुढे दिलेला फार्म दिसेल , तो आॅनलाईन पध्दतीने भरून त्यात नमुद केलेली कागदपत्रे अपलोड करावीत , तसेच आपला संपुर्ण अर्ज अपलोड केल्यावर त्याची प्रत काढुन जवळ ठेवावी.
      ही आपली नोंदणी महाज्योतीकडे करण्यासाठी 10 जुलै 2024 ही अंतिम  मुदत देण्यात आली होती. त्यासंदर्भात श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन व S महाराष्ट्र 7 न्युज चे संपादक राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच शासनाच्या वतीने सुरु झालेली लाडकी बहीण योजनेमुळे कागदपत्रे मिळण्यासाठी होणाऱ्या विलंब लक्षात घेता बरेच विद्यार्थी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी महाज्योतीचे व्यवस्थापिय संचालक यांना पत्राद्वारे फोन वर विनंती केली होती त्यानुसार महाज्योती कडून सदर फॉर्म भरणे कामी दिनांक 25 जुलै 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

      तरी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी महाज्योतीच्या या योजनेचा फायदा घ्यावा असे आव्हान संघटनेचे श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन व S महाराष्ट्र 7 न्युज चे संपादक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp