महसूल पंधरवाडा 2024 अंतर्गत समाजकार्य महाविद्यालयात "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" बाबत मार्गदर्शन शिबिर..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

03/08/2024

महसूल पंधरवाडा 2024 अंतर्गत समाजकार्य महाविद्यालयात "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" बाबत मार्गदर्शन शिबिर.....


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          महसूल पंधरवाडा 2024 अंतर्गत समाजकार्य महाविद्यालयात "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" बाबत मार्गदर्शन शिबिर.....

        महसूल पंधरवडा 2024 कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 2/8/2024 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत समाज कार्य महाविद्यालय चोपडा येथे "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

        श्री आर आर महाजन नायब तहसीलदार महसूल यांनी सदर योजनेअंतर्गत शासनामार्फत तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्याबाबत युवकांना आवाहन केले, सदर योजनेविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार श्री योगेश पाटील यांनी स्पर्धा परीक्षा बाबत उपयुक्त असे मार्गदर्शन उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले.
          कार्यक्रमाचे शेवटी प्रमुख पाहुणे तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री भाऊसाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने संदर्भात तसेच महसूल विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागामार्फत राबवले जाणाऱ्या योजना बाबत सविस्तर माहिती दिली. 

         सदर कार्यक्रमास महविद्यालयचे प्राचार्य श्री.सौंदांणकर व आय.टी आय.महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर ए पाटील उपस्थित होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा सुमारे 250 महाविद्यालयीन युवक व युवतींनी लाभ घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज