ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

10/08/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा

        महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांती दिन साजरा केला गेला. 9 ऑगस्ट 1925 या दिवसाला भारतीय इतिहासात एक महत्वपूर्ण स्थान आहे. 9 ऑगस्ट 1925 या दिवशी काकोरी कांडाच्या माध्यमातून क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला. 9 ऑगस्ट 1942 या दिवसापासून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली. क्रांती दिनाविषयी शाळेतील शिक्षिका हर्षा पाटील  यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तत्पूर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि समन्वयक अश्विनी पाटील, दिप्ती पाटील, सुचिता पाटील आणि दिपाली पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

         9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. 9 ऑगस्ट 1994 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने 9 ऑगस्ट हा दिवस  जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला. शाळेतील शिक्षिका हर्षा पाटील यांनी आदिवासी दिनाची देखिल माहिती सांगितली. 

         क्रांती दिनाच्या अनुषंगाने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले. या प्रश्नमंजुषेसाठी शाळेतील शिक्षिक अश्विनी पाटील, सुचिता पाटील, प्राजक्ता सोनवणे, वैशाली गायकवाड, दिपाली पाटील, किर्ती चौधरी आणि कपिल पाटील यांचे सहकार्य लाभले. 

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज