चोपडा नगरपरिषद पथविक्रेता समिती सदस्य पदाची निवडणुक बिनविरोध.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

27/08/2024

चोपडा नगरपरिषद पथविक्रेता समिती सदस्य पदाची निवडणुक बिनविरोध....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा नगरपरिषद पथविक्रेता समिती सदस्य पदाची निवडणुक बिनविरोध....

         चोपडा नगर परिषद पथविक्रेता समितीच्या सदस्य पदाची निवडणुक बिनविरोध झाली आहे. एकुण 8 जागांसाठी 8 अर्ज आल्याने या सर्व विजयी सदस्यांचे स्वागत करुन या उमेदवारांना सदस्य निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात सरलाबाई ओंकार चौधरी (सर्वसाधारण प्रवर्ग महिला राखीव), गोपाल सत्यवान देशमुख (सर्वसाधारण प्रवर्ग), महेश वंसतराव पाटील (सर्वसाधारण प्रवर्ग), रंजनाबाई भिकन माळी इतर मागास प्रवर्ग (महिला राखीव), नकोबाई मोहन महाजन, (विकंलाग महिला राखीव), जावेद जहिरोद्दीन शेख (अल्पसंख्याक), रविंद्र वालजी शिरसाठ (अनुसुचित जाती), रतिलाल वसंत चव्हाण (अनुसुचित जमाती) असे बिनविरोध उमेदवार जाहीर करण्यात आले. चोपडा नगर परिषद पथ विक्रेता समिती निवडणुक 2024 निवडणुक निर्णय अधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली.

         याप्रसंगी सहा. निवडणुक निर्णय अधिकारी संजय मिसर, करनिर्धारण अधिकारी अक्षय चौधरी, प्र.कार्यालय अधिक्षक रविंद्र जाधव, नगर रचना अभियंता चेतन अहिरराव, शहर अभियान व्यवस्थापक गणेश पाठक, समुदाय संघटक अरुण राजपुत, वरिष्ठ लिपीक अनिल चौधरी, छगन सरोदे, विनोद सोनार, प्रविण राजपुत यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी बिनविरोध निवडुन आलेल्या उमेदवाराना निवडीचे प्रमाणपत्र छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे देण्यात येऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज