महिला व मुलींवर अत्याचार करणारे नराधमावर कायदेशीर कारवाई करा चोपडा तहसिलदारांना मानव विकास पत्रकार संघ तर्फे निवेदनाद्वारे मागणी.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

31/08/2024

महिला व मुलींवर अत्याचार करणारे नराधमावर कायदेशीर कारवाई करा चोपडा तहसिलदारांना मानव विकास पत्रकार संघ तर्फे निवेदनाद्वारे मागणी....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

            महिला व मुलींवर अत्याचार करणारे नराधमावर कायदेशीर कारवाई करा चोपडा तहसिलदारांना मानव विकास पत्रकार संघ तर्फे निवेदनाद्वारे मागणी....

         मानव विकास पत्रकार संघ चोपडा तर्फे निवेदन देण्यात आले असून त्यात कलकत्ता येथील दि. 9/ 8 / 2024 रोजी आर. जी. मेडीकल कॉलेज मधील अत्याचाराचा घटनेबाबत संबंधित दोर्षीना त्वरीत फाशी द्या व बदलापूर व चोपडा, अमळनेर, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बालिकांवरील अमानुष घटनेचा आरोपीस फाशी शिक्षा देवून महाराष्ट्रातील महिला व मुली यांच्यावरील अत्याचारात सहभागी असलेल्या दोषीनवर कडक कारवाई करा. शाळा व कॉलेजांमध्ये सि. सि. टी. व्ही. कॉमेरे बसवा. महिला अत्याचाराच्या घटनेत महाराष्ट्रात मोठ्‌या प्रमाणात वाढ होत असून त्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

         तरी बदलापूर घटनेतील लैंगीक अत्याचार करणाऱ्या नराधमास व कलकत्ता येथील बलात्कार व जबर मारहाण करुन हत्या करण्यात आलेल्या घटनेतील नराधमांवर अतिजलद न्यायालयात खटला चालवून दोषीना फाशी ची शिक्षा द्या. देशासह महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटना त्वरीत थांबवा व महिलांची सुरक्षा बाबत उपाय योजना करा. 

        तसेच नुकत्याच चोपडा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा‌ऱ्या आरोपीवर देखील त्वरीत कायदेशीर कारवाई करा. महिला व बालिका यांना सुरक्षितेची हमी द्या त्यासाठी हे निवेदन देत आहोत. अशा आशयाचे निवेदन चोपडा तहसिलदार मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

         निवेदन देते वेळी हेमकांत गायकवाड मानव विकास पत्रकार संघ जिल्हा सचिव, समाधान कोळी जिल्हा संघटक, वसीम खाटीक प्रदेश अध्यक्ष, रवींद्र कोळी राष्ट्रीय सदस्य, दिलीप पाटील विभागीय अध्यक्ष, शेख मोहसीन शेख राऊत धुळे जिल्हा संघटक, बिलाल शेख तालुका प्रसिद्धी प्रमुख, सुनिल पावरा तालुकाध्यक्ष, रविद्र कोळी चोपडा तालुकाध्यक्ष, मिलिंद वाणी कार्याध्यक्ष, गजानन कोळी सदस्य, भिकन कोळी सदस्य, पवन कोळी सदस्य, जाकीर अली महमूद सदस्य, निजाम कुरेशी सदस्य, लीलाधर बाविस्कर सदस्य, भूषण बाविस्कर सदस्य आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज