आनंद दिघे यांचे कार्य प्रेरणादायी , एकनाथ भोईर यांचे प्रतिपादन.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

01/09/2024

आनंद दिघे यांचे कार्य प्रेरणादायी , एकनाथ भोईर यांचे प्रतिपादन....

 

चोपडा (गणपूर - प्रतिनिधी) : - -

        आनंद दिघे यांचे कार्य प्रेरणादायी , एकनाथ भोईर यांचे प्रतिपादन....

          स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य महाराष्ट्रासाठी आजही प्रेरणादायी असून त्यांनी राजकारणा पेक्षा समाजकारण अधिक करत गरजूंची कामे करत त्यांचे प्रश्न सोडवले. असे मत ठाणे येथील नगरसेवक एकनाथ अनंत भोईर यांनी येथील धक्का चौकावर आयोजित धर्मवीर आनंद दिघे चौकाचे नामकरण प्रसंगी व्यक्त केले. यांच्याहस्ते चौकाचे नामकरण करण्यात आले .

           कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम भावलाल पाटील होते. यावेळी रोजगार मेळाव्याचे ही आयोजन करण्यात आले होते. लाडकी बहिण योजने बरोबरच लाडका भाऊ योजनेचाही लाभ युवकांनी घ्यावा. योजना दूतामार्फत प्रस्ताव देऊन आपल्या स्वप्नांना आकार द्यावा असेही भोईर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
        कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पाटील , सुनील पाटील, संभाजी पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील , भाजपचे सरचिटणीस प्रदीप पाटील, माजी नगरसेवक डॉ महेंद्र पाटील, दीपक चव्हाण(ठाणे), प्रमोद पाटील, शशिकांत देवरे, अनिल वानखेडे, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, जिल्हा उद्योग केंद्राचे समन्वयक समीर भाटिया व्यासपीठावर उपस्थित होते. 

         यावेळी समीर भाटिया यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती दिली. नीता पाटील, पी. आय. कावेरी कमलाकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष शांताराम पाटील यांनी समानता आणि समभावाचा संगम असणाऱ्या आनंद दिघे यांचे नाव चौकाला दिल्याबद्दल समाधान व्यक्त करत रोजगाराची माहिती गरजूंना उपलब्ध झाल्याचे अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार ऍड. बाळकृष्ण पाटील यांनी मानले .

         कार्यक्रमाला राजेंद्र पाटील (बिटवा), गलवाड्याचे माजी सरपंच हभप संजय सोनवणे, संतोष जाधव, संजय पाटील, अरुण पाटील, गोपाल महजन, मनोज देशमुख, अरुण पाटील, दीपक पाटील, सरपंच भूषण गायकवाड, आनंदराव पाटील, माधवराव पाटील, अंबादास राजपूत, उपसरपंच मीराबाई पाटील, आयोजक दीपक पाटील, नवयुवक दुर्गा मंडळाचे सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज