Post Top Ad
Responsive Ads Here
03/09/2024
Home
Unlabelled
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय पंचकोश विकसन या विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात व्याख्यानपर कार्यशाळा संपन्न....
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय पंचकोश विकसन या विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात व्याख्यानपर कार्यशाळा संपन्न....
चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात 5 सप्टेंबर 2024 शिक्षकदिनानिमित्त सर्व विभागाच्या शिक्षकांसाठी प्रबोधन व्याख्यानपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय पंचकोश विकसन या विषयावर मुंबई येथील डॉ.प्राची साठे यांनी कार्यशाळा घेत व्याख्यान दिले. कार्यक्रमाची सुरुवात ओमकार व विद्यालय माझे देवाचे मंदिर या गीताने तसेच सरस्वती देवी व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. प्रस्तावना विद्यालयाचे मुख्याध्यापक व विश्वस्त नरेंद्र भावे यांनी केले. व्याख्याते डॉ.प्राची साठे यांचा परिचय उपशिक्षक प्रसाद वैद्य यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जावेद तडवी यांनी केले. फलक लेखन व पोस्टर निर्मिती तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते व सुंदर रांगोळी रेखाटन शितल देसाई, सीमा पाटील, कविता सनेर यांनी काढली. कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, सचिव अॅड. रवींद्र माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अशा चित्ते बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे इंग्रजी विभागाच्या प्रिन्सिपल सुरेखा मिस्त्री जुनिअर कॉलेजचे प्रिन्सिपल पी.सी.पाटील यांच्या सह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यशाळेत डॉ.प्राची साठे यांनी खूप सोप्या भाषेत शिक्षकांना मार्गदर्शन केले त्यांनी पुढील मुद्द्यांवर प्रकाश ज्योत टाकला. @ आतापर्यंतचे शैक्षणिक धोरण # नवनवीन पाठ्यपुस्तके जरी बदलत गेलीत परंतु त्याचा मुख्य गाभा तसाच राहतो @ शिक्षणाचा समवायात्मक (कोलाब्रेशन )-नवनिर्मित दृष्टिकोन ( को- क्रीयेशन ) # अध्ययन अध्यापन आयाम शिक्षण प्रक्रियेत @ अनुभवाधारित - सर्व समावेशक - विषय समवाय - कुतूहलाय पोषक - शोधकवृत्ती विकास - विद्यार्थी केंद्री यावर सविस्तर मार्गदर्शन केले. # जिथे कमी तिथे आम्ही अर्थात शिक्षक @ विद्यार्थी - शिक्षकांशी कनेक्ट व्हायला हवा # अनुभवातून अनुभव संकल्पना स्पष्ट केली @ शिक्षकाला कठीण गोष्ट सोपी करता आली पाहिजे # गणिताच्या सूत्राने अवाढव्य गोष्टी कागदावर उतरवता येतात @ शिक्षकांनी चला बघूया ही संकल्पना बदलली पाहिजे # 21व्या शतकात का ? ची भाषा आहे @ पारंपारिक उपक्रम मुळापासून बदलवली पाहिजेत # 21व्या पिढीला सुलभ पद्धतीने पुढे जायचे आहे @ विज्ञान, गणित, भूगोल या विषयातील मूळ शब्द व संकल्पना यांचा बोलीभाषेत अर्थ सांगावा # पुस्तकाची अनुक्रमणिका रियल लाइफ कनेक्ट करा @ शब्दार्थ सूची # नवीन निर्मितीला नाव देता आले पाहिजे तेही अर्थपूर्ण @ मुलांचा मोबाईल आता त्यांचा अवयव आहे तो तुम्ही जर दूर करू शकत नाही तर तो कसा चांगला वापरायचा हे शिकवलं पाहिजे # विज्ञानातील सायंटिफिक नावे हे ग्लोबलिक असतात @ वेगळ्या पद्धतीने मुलांच्या कुतूहलाला खतपाणी घालणे म्हणजे NEP 20-20 # मुलांना कल्चरल शॉक देऊन चालणार नाही @ विकास कधीच होत नाही विकासाची प्रक्रिया सुरू करायची असते #आई - वडील मुलगा कमवता झाल्यावरच त्याचे मित्र व्हायला पाहिजे @ जिथे मन भीती पेक्षा मुक्त आहे तिथे ज्ञान आहे # प्रत्येक मुलगा आपल्या पद्धतीने शोध घेत असतो @ ज्या त्या भाषेला त्याचे स्थान असते # अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षकाचे काम नाही तर त्यातील गाभाचा मुलांना अनुभव देणे काम आहे @ शिक्षणाची तत्वे -1 आकलन क्षमता विकास 2 मूलभूत क्षमता विकास (भाषिक व गणितीय ) 3 उच्च प्रतीच्या आकलन क्षमतेचा विकास # कोणती गोष्ट आपल्याला सुरुवातीला मोठी दिसते नंतर गरजेनुसार ती विभागून लहान होते @ प्रश्नांची उत्तरे मिळवून देणे गृहपाठ नाही तर प्रश्न निर्माण करून उत्तर स्वतः शोधणे म्हणजे गृहपाठ # शिक्षकांना नेमकं प्रश्नच विचारता येत नाहीत @ मुलांशी कनेक्ट व्हा # शिक्षकांसारखा दुसरा निरीक्षक जगाच्या पाठीवर नाही @ ज्या विद्यार्थ्यांचे जिथे डोकं चालते तिथे ते खाद्य त्याला द्या # संसाधनांची व्यवस्था करून द्या @ भारतीय ज्ञान - दीपस्तंभ -(ज्ञान ) (प्रज्ञा ) (सत्य ) # शाळाबाह्य जीवनाभिमुख शिक्षण @ आत्मज्ञान व आत्मभान असणं # असणं आणि दिसणं समजले पाहिजे @ बदल हा बदल असतो त्याला चांगला वाईट टॅग लावू नये # नॅशनल एज्युकेशन मिशन सबमिशन (मिशन ) ( व्हीजन ) ( व्ह्यॅल्युज ) @ भारताला राष्ट्र म्हणून एक स्वतःची परंपरा / संस्कृती आहे # भारतीयांच्या DNA मध्ये कनेक्टिव्ह जीन्स आहे.तो एकत्रच राहू शकतो @ आपण दिवसभर मुलांची काय बोलले ते लिहून ठेवावे व त्यानंतर त्याचा अभ्यास करून विचार करावा # पालकांनी पालकच व्हावे व शिक्षकांनी शिक्षक तरच परिणामकारक बदल दिसणार @ नापास मुलांनीच जगात इतिहास घडवला आहे # पालकांनी पालक व्हा हे सांगायला लागतं हे देशाचे दुर्दैव @ मुलांना स्वतः निर्णय घेऊ द्या # निर्णय क्षमतेचा विकास कोण करणार पालकांनी विचार करा @ शिक्षण हे बाह्य शिक्षणाबरोबर येणे आंतरिक विकासास पोषक असावे # मुलांना अन्नावर प्रेम करायला शिकवा @ अन्नाचे संस्कार द्या # हट्टी मुलांचे रडणे सहन करायला शिका @ भारतीयांचा जीन्स कथेतून शिकणारा आहे # मुलांना कथा गोष्टी सांगत चला @ आनंदी राहा # मुलांना पूर्ण आनंद व्यक्त करू द्या @ जेवढा आनंद व्यक्त करणार तेवढच ते दुःख व्यक्त करतील या मुद्द्यांवर सविस्तर व्याख्यान पर कार्यशाळा घेत अतिशय सुंदर पद्धतीने शिक्षकांना डॉ.प्राची साठे मुंबई यांनी मार्गदर्शन करत शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment