सेवा शिक्षक मंडळाचे 23 व्या वर्षाचे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

04/09/2024

सेवा शिक्षक मंडळाचे 23 व्या वर्षाचे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

 

सौ. विजया पाटील  अर्जुन कोळी  मधुकर पाटील

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          सेवा शिक्षक मंडळाचे 23 व्या वर्षाचे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

         चोपडा तालुक्यात गेल्या 22 वर्षांपासून शिक्षक दिनानिमित्त चोपडा येथील सेवा शिक्षक मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहनपर शिक्षक गौरव पुरस्कार दिले जातात. सेवा शिक्षक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विलास पं. पाटील (खेडीभोकरीकर) व ॲड.डी.पी.पाटील यांच्या परिवाराकडून त्यांच्या मातृपितृ स्मरणार्थ ह्या पुरस्कारांचे वितरण केले जाते.

@  यंदा 23 व्या वर्षाचे हे पुरस्कार यांना दिले जाणार  @

        1) सौ.विजया यशवंत पाटील, पंकज माध्यमिक विदयालय (विषय शिक्षक विभाग) , 2) अर्जुन देवकीनंदन कोळी , अहल्याबाई होळकर विद्यालय कमळगांव (कला शिक्षक विभाग) , 3) मधुकर श्यामराव पाटील (जि.प. प्राथमिक शाळा धनवाडी) वरील 3 विभागात दरवर्षी शिक्षक दिनानिमित जाहीर होणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा सेवा शिक्षक मंडळ संस्थापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील (खेडीभोकरीकर), मुख्याध्यापक नरेंद्र भावे, सेवानिवृत मुख्याध्यापक हितेंद्र बी. मोरे, पर्यवेक्षक साहेबराव एस. पाटील, मुख्याध्यापक मंगेश भोईटे व संजय बारी सर यांनी केली आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज