गुर्जर समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापना निर्णयाचे चोपड्यात स्वागत ! ! - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

11/10/2024

गुर्जर समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापना निर्णयाचे चोपड्यात स्वागत ! !

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         गुर्जर समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापना निर्णयाचे चोपड्यात स्वागत ! ! !

         महाराष्ट्रातील विशेषतः खानदेशातील गुजर समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळाल्याबद्दल खासदार ना. रक्षाताई खडसे तसेच ना. गुलाबराव पाटील, ना. गिरीश महाजन व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी समाजाला मिळालेले हे महामंडळ आनंदाची बाब आहे. या कार्याबद्दल लोकप्रतिनिधींचे आभार मानण्यासाठी चोपडा नगरपालिके जवळ आज दिनांक 11 रोजी दुपारी 1 वाजता समाजातील सर्व पोट जातीं व लोकप्रतिनिधीनी या निर्णयाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
        दोडे गुजर संस्थांचे अध्यक्ष चंद्रशेखर युवराज पाटील, छन्नू झेंडू पाटील (गोरख तात्या), जी टी पाटील, यांच्यासह समस्त समाज बांधवांनी आनंदोत्सवात भाग घेतला. गुजर समाजातील मान्यवरांनी प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर स्वाद्य मिरवणूकीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 
           यावेळी दोडे गुर्जर संस्थांचे अध्यक्ष चंद्रशेखर युवराज पाटील, छन्नू झेंडू पाटील (गोरख तात्या), जी टी पाटील, मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र पाटील, गुर्जर संस्थांचे संचालक डी बी पाटील, पत्रकार रमेश जे. पाटील, पत्रकार राजेंद्र गोकुळ पाटील, विलास पाटील (खेडीभोकरी), एम. व्ही. पाटील (मोहिदे), डॉ. तृप्ती पाटील, डॉ. राहुल पाटील, माजी नगरसेवक विकास पाटील, राजाराम पाटील, कांतीलाल पाटील (वर्डी), राजेंद्र गंगाधर पाटील (वेले), प्रा. एस के पाटील, राजेंद्र  पाटील (कल्याण), डॉ. अनिल रामदास पाटील, डॉ. पंकज पाटील, डॉ. पारस पाटील, शरद पाटील, सतीश पाटील (वेले ), चंद्रकांत पाटील (खरद), किशोर पाटील (गोरगावले), संभाजी पाटील (आडगाव), सुनील महाजन (अक्कूलखेडा), अरुण पाटील, कैलास पाटील, भिका पाटील, हिम्मतराव पाटील (गरताड) गजानन पाटील, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

         यावेळी चंद्रशेखर पाटील यांनी खासदार तसेच दोन्ही मंत्री व महाराष्ट्र शासन यांचे आभार मानून आपले मनोगत वक्त केले. तदनंतर गुर्जर समाजाला समाज भवनासाठी महाराष्ट्र शासनाने सत्तर लाख रुपये निधी मंजुर केला असून लवकरच त्याचा भूमिपूजन समारंभ येत्या 13 तारखेला होणार आहे त्यावेळी समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज