चोपडा विधानसभा मतदार संघात 70 मतदार करणार गृह मतदान.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

09/11/2024

चोपडा विधानसभा मतदार संघात 70 मतदार करणार गृह मतदान....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपडा विधानसभा मतदार संघात 70 मतदार करणार गृह मतदान....

          यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी चोपडा विधानसभा मतदारसंघांमध्ये दहा तारखेपासून गृह मतदानाला सुरुवात होते आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून चोपडा विधानसभा मतदारसंघातील 70 मतदारांना त्यांच्या मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी प्रशासन थेट त्या मतदारांच्या घरी जाऊन होम वोटिंग करवून घेणार आहे. ही सर्व प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि इन कॅमेरा राबवली जाणार आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार आणि दीर्घ आजार किंवा दिव्यांग अशा कारणांमुळे मतदान न करू शकणाऱ्या 70 मतदारांना गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

         गृह मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत पाच पथकांचे नेमणूक करण्यात आली आहे. सदर पथकातील कर्मचाऱ्यांना दिनांक सात नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय या पथकांसोबत पोलीस कर्मचारी व्हिडिओ फोटोग्राफर आणि अधिकारी वर्ग देखील उपस्थित राहणार आहे. 

          निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज