"सरदार पटेलांची सदैव देण्याची वृत्ती " वल्लभभाई पटेल जयंती प्रसंगी विलास पाटील यांचे प्रतिपादन - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

01/11/2024

"सरदार पटेलांची सदैव देण्याची वृत्ती " वल्लभभाई पटेल जयंती प्रसंगी विलास पाटील यांचे प्रतिपादन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         "सरदार पटेलांची सदैव देण्याची वृत्ती " वल्लभभाई पटेल जयंती प्रसंगी विलास पाटील यांचे प्रतिपादन 

            राजकारणासह सर्वत्र आपल्याच ताटात सर्व ओढण्याच्या आजच्या वर्तमान पार्श्वभूमीवर आपलं बॅरिस्टर होण्याच्या स्वप्न पूर्तीसाठी लंडन जातांना आधी भावासाठी  लंडनला जाणं सोडणारे , त्यानंतर घरदार स्वकमाई देखील भावासाठी सोडणारे व एव्हढेच नव्हे तर स्वातंत्र्य प्राप्ती प्रसंगी सरदार पटेल भारताचे प्रथम पंतप्रधान व्हावेत असं सर्व जनांना वाटत असतांना म. गांधी व पंडित नेहरूंसाठी पंतप्रधान पद सोडणारे आधुनिक व अखंड भारताचे निर्माते - आधुनिक चाणक्य , भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल हे सदैव देण्याची वृत्ती असणारे कणखर व्यक्तिमत्त्व होते असे प्रतिपादन भारतीय गुर्जर परिषद दिल्ली शाखा चोपडा आयोजित लोहपुरुष सरदार पटेल जयंती प्रसंगी भारतीय गुर्जर परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील यांनी केले. 

         सरदार पटेलांच्या 150 व्या जयंतीचे निमित्त साधून भारतीय गुर्जर परिषद दिल्ली शाखा चोपडा तर्फे दिपक भानुदास पाटील यांच्या संकल्पनेतून चोपडा गुर्जरसमाज स्नेहमिलन सोहळा व युवकांसाठी  एकदिवसीय बॉक्स क्रिकेट स्पर्धा व स्नेहभोजन आयोजन करण्यात आले होते.
           सरदार पटेल जयंती उत्सवाच्या प्रारंभी निवृत्त प्राध्यापक आडगावकर एस. के. पाटील व सनपुलेकर कलाशिक्षक एस. एच. पाटील यांच्या शुभहस्ते भारतरत्न पटेलांच्या प्रतिमा पूजनाने स्नेहमिलन सोहळा व क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विलास पाटील यांनी लोहपुरुष सरदार पटेलांच्या गुणवैशिष्ट्यांना अधोरेखित करतांना त्यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना वंदन केले.

          गुर्जर समाज युवकांसाठी आयोजित 5 - 5 षटकांच्या एकदिवसीय बॉक्स क्रिकेट स्पर्धेत सहभागी 8 संघातून गजानन पाटील गाढोदेकर यांच्या नेतृत्वातील सुपर एट संघ विजेता तर वंदेमातरम हा संघ उप विजेता ठरला. विजेत्या संघास कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील गरताडकर तर उपविजेत्या संघास कृउबा संचालक गोपाल पाटील खरगकर यांच्या शुभहस्ते विजयी चषक प्रदान करण्यात आले. रात्री स्नेह भोजनाने जयंती उत्सवाची सांगता झाली. 

         या समाज स्नेहमिलन सोहळा व क्रिकेट स्पर्धेप्रसंगी वरोल्लेखित मान्यवरांसह स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ .दीपक चौधरी , दंतरोग तज्ज्ञ डॉ. राहूल पाटील , डी. बी. पाटील , यशवंत पाटील , कैलास व नितीन चौधरी , प्रा.शरद पाटील , भरत पाटील आदी समाज बांधवांची उपस्थिती होती. जयंती उत्सव यशस्वीते साठी सोहळा व स्पर्धा संकल्पना साकारणारे दीपक भा. पाटील , भगवान पाटील  , शत्रुघ्न पाटील इ. परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज