चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे मुले व भाच्यांचा अभिनव उपक्रम.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

03/11/2024

चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे मुले व भाच्यांचा अभिनव उपक्रम....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे मुले व भाच्यांचा अभिनव उपक्रम....

        आज काल लहान मूल ही दिवाळीच्या सुटीत मोबाईल आणि फटाके फोडण्यात व्यस्त असतात. परंतु चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटिल यांची मुलगी दुर्वा पाटिल मुलगा यश पाटिल आणि त्यांचे 4 भाचे यांनी फटाके न फोडता दिवाळीच्या सुटीचा सदुपयोग करत भारतीय संस्कृती जपत करत छान मातीचा किल्ला तयार केला.

            किल्ल्याला सजावट करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना करण्याची संस्कृती व परंपरा कायम राखण्याचे काम केले आहे. आज कालची मुले मोबाईल वर गेम खेळणे , रील पाहणे , पब्जी सारखे विपरीत परिणाम करणारे गेम खेळतात. 
             त्याविपरीत त्यानी दिवाळीच्या कालावधीत किल्ला बनवण्याची संस्कृती व परंपरा कायम राखत आपल्या शासकीय निवासस्थानात 19 तास मेहनत करून 16 किलो शाडू माती वापरून किल्ला तयार करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना केली तसेच त्यांच्यावर असलेल्या संस्काराचे दर्शन घडविले.

           या त्यांच्या संस्कृतीपूर्ण व भारतीय परंपरा जतन करण्याच्या उपक्रमाला नगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले. त्याच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

         S महाराष्ट्र 7 न्युज परिवारातर्फे या सर्वांचे खुप खूप अभिनंदन

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज