चोपडा येथील निवडणूक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण निवडणूक निरीक्षक अरुण कुमार यांच्या उपस्थितीत संपन्न - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

11/11/2024

चोपडा येथील निवडणूक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण निवडणूक निरीक्षक अरुण कुमार यांच्या उपस्थितीत संपन्न

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा येथील निवडणूक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण निवडणूक निरीक्षक अरुण कुमार यांच्या उपस्थितीत संपन्न 

        चोपडा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा च्या प्रांगणात संपन्न झाले. यावेळी दोन सत्रात हे प्रशिक्षण पार पडले. 

         सकाळच्या सत्रात एकूण 835 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली होती. यापैकी 809 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. तर 9 मतदान केंद्राध्यक्ष, 3 प्रथम मतदान अधिकारी आणि 13 इतर मतदान अधिकारी असे एकूण 25 कर्मचारी पहिल्या सत्रात गैरहजर होते. मौखिक प्रशिक्षणानंतर सर्व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्र हाताळणीचे जोडणीचे प्रशिक्षण देण्यात आले. ईव्हीएम यंत्र प्रत्येकाला हातरता यावे यासाठी प्रत्येकाला वैयक्तिक प्रात्यक्षिकाची संधी देण्यात आली. प्रशिक्षणानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देखील घेण्यात आली. 
            दुपारच्या सत्रात 801 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यापैकी 776 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले तर 6 मतदान केंद्राध्यक्ष, 5 प्रथम मतदान अधिकारी, आणि 14 इतर मतदान अधिकारी असे एकूण 25 कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. 

         प्रशिक्षण यशस्वीतेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, यांच्या मार्गदर्शनाखाली  निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, निवासी नायब तहसीलदार सचिन पाटील, प्रशिक्षण नोडल अधिकारी नरेंद्र सोनवणे, मुख्याधिकारी राहुल पाटील, सर्व क्षेत्रीय अधिकारी, मास्टर ट्रेनर्स, निवडणूक कमी नियुक्त करण्यात आलेले सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 
       @ प्रशिक्षणस्थळी टपाली मतदानासाठी सुविधा केंद्राची सुविधा @

          निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशिक्षणस्थळी टपाली मतदान कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात टपाली मतदान कक्षाचे नोडल अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे आणि सहाय्यक निवडला अधिकारी सतीश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज