जिवनातलं सर्वात " श्रेष्ठ दान -मतदान महादान " होय --- निर्मल बोरा - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/11/2024

जिवनातलं सर्वात " श्रेष्ठ दान -मतदान महादान " होय --- निर्मल बोरा


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         जिवनातलं सर्वात " श्रेष्ठ दान -मतदान महादान " होय --- निर्मल बोरा 

           सर्व काही दान केलं आणि संविधानांने दिलेले मतदानचं हक्कचं नाही बजविले तर विचार करा आमचे भविष्यात काय होईल यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजवायलाच हवे असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे नूतन जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा यांनी केले आहे.

         भारत माताच्या पवित्र भूमीवर जन्म मिळाले हे आमचे सर्वांत मोठे सौभाग्य आहे. आम्ही या पवित्र भूमीवर भरपूर पैसे कमवलें, बंगला, फ्लॅट, घर, दुकान, गाडी जीवनातल्या आवश्यक सुख सोयींच्या वस्तूचा आपण उपभोग घेतला आणि अजून पर्यंत आपण ज्याच्या त्याच्या परिने कमवतचं आहे.जे सुख सुविधांचा आपण विचार देखील केला नव्हता अश्या काही सूखसुविधा आपण उपभोग घेत आहोत परंतु या सर्वांना सुरक्षित ठेवणारा हा आपला महान देश आणि या महानदेशाचे पर्व मतदान....! आणि हाच हक्क बजविण्यासाठी आपण कंटाळा करतो. विचार करा आपलें भविष्य आपणच खड्ड्यात टाकत आहोत. लोकशाही जिंवत ठेवायची असेल तर मतदानाला सर्व मतदार बंधूंनी आपलं मतदान करायलाच हवे.आपली जबाबदारी समजून हा हक्क सर्वांनी बजवायलाच हवा असे बोरा यांनी सांगितले.

          मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने आपण आपले मतदानाचे हक्क सोडून फिरायला जातो. हे लोकशाही साठी घातक आहे देश सुरक्षित पाहिजे असेल तर 100% मतदान व्हायला हवे. आणि यावर निवडणूक अधिकारी, व शासनाने 100% मतदानाची सक्ती करायला हवी. मतदानाची सक्ती केली तरच सामान्य माणूस निवडून जाऊ शकतो. प्रत्येक निवडणुकीत करोडो रुपयांचा पाऊस पडतो त्याला आळा बसू शकतो व लोकशाही जिवंत राहू शकते. देशात राहून देश विरुद्ध गोष्टी करणाऱ्याच्या तोंडाला कुलूप कसे लावायचे ? आमचं भविष्य उज्ज्वल असून त्याला अजून उज्ज्वल बनवायचे असेल तर 100% मतदान होणे आवश्यक आहे. देशातील व आपल्या घरातील प्रत्येक वस्तू सुरक्षित पाहिजे असेल तर पाच वर्षात एकदाचं येणारा पर्वाला मतदानाचा हक्क बजवुन उमेदवाराला देश सेवा करण्याची संधी द्या. 

        एक मतदान करण्यासाठी ठराविक वेळ लागतो. पाच वर्षात काही ठराविक वेळ एकदाच काढायची आहे. मतदानाचा पर्व राष्ट्रीय पर्व म्हणून मनवा आणि राष्ट्र मजबुत बनवा भारतीय संस्कृतीला जिवंत ठेवायचे आणि आम्हाला सुरक्षित राहायचे असेल तर मतदानाचे अधिकाराचा उपयोग निश्चित करा. आणि भारत मातेचे रक्षण करा असे आवाहन निर्मल बोरा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज