चोपडा विधानसभा मतदारसंघात उत्साहात, शांततेत, सुरळीत पार - 63 टक्के मतदान - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

20/11/2024

चोपडा विधानसभा मतदारसंघात उत्साहात, शांततेत, सुरळीत पार - 63 टक्के मतदान

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

        चोपडा विधानसभा मतदारसंघात उत्साहात, शांततेत, सुरळीत पार - 63 टक्के मतदान 

       चोपडा विधानसभा मतदारसंघात 337 केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया शांततेत संपन्न झाली. यावेळी 63 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. 38 क्षेत्रांमध्ये विभागलेल्या या मतदारसंघात जवळपास सर्वच मतदारसंघात सकाळी मतदारांचा कल कमी होता मात्र वेळेसोबत नंतर मतदानाचा टक्का वाढत गेला. 

         
 मतदानाची प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर डॉ.सुरेश जी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या मतदान साहित्य स्वीकृती केंद्रात मतदान यंत्रे आणि साहित्य जमा करून घेण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या वतीने अत्यंत सुटसुटीत आणि उत्तम नियोजन केल्याने आलेल्या पथकांची धावपळ टळली. कमी वेळात, कमी श्रमात मतदान साहित्य स्वीकारले जावे यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचे सर्व कर्मचारी आणि पथकांनी कौतुक केले. 

         यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसिलदार सचिन बांबळे, निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, यांच्यासह सर्व नायब तहसीलदार सर्व विभागांचे नोडल अधिकारी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज