चोपडा येथील मुमुक्षु आत्मा जिनल रवींद्र जैन हिच्या दीक्षा निमित्त वर्षीदान वरघोडा थाटामाटात संपन्न.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

27/11/2024

चोपडा येथील मुमुक्षु आत्मा जिनल रवींद्र जैन हिच्या दीक्षा निमित्त वर्षीदान वरघोडा थाटामाटात संपन्न....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा येथील मुमुक्षु आत्मा जिनल रवींद्र जैन हिच्या दीक्षा निमित्त वर्षीदान वरघोडा थाटामाटात संपन्न....

       चोपडा येथील जुने प्रतिष्ठान रवींद्र गृह वस्तू भांडार चे संचालक दिपाली व रवींद्र नरसी जैन यांची सुपुत्री मुमुक्षु आत्मा जिनल रवींद्र लोडाया ह्या 11 डिसेंबर 2024 रोजी दीक्षा ग्रहण करणार असून त्यानिमित्त चोपडा शहरात वर्षीदान वरघोडा कार्यक्रम संपन्न झाला. सदरील वरघोडा बाजारपेठेतील प्रिया जनरल येथील निवासस्थानापासून सुरुवात होऊन चावडी , गोल मंदिर, विद्यासागर जी महाराज मार्ग, राणी लक्ष्मीबाई चौक गांधी चौक ते परत मेनरोड मार्गे मुनी सुव्रत स्वामी जैन मंदिर येथे समारोप करण्यात आला.

       सुरुवातीला बँड पथक तद् नंतर पुरुषवर्ग शांतिनाथ भगवानचे भव्यरथ त्यामागे साध्वी भगवंत प. पू. प्रमोदिताश्रीजी महाराज व त्यांचे सुशिष्या व महिला मंडळाचे सदस्य व सर्वात शेवटी दीक्षार्ती भगिनीचे रथ असे मार्गक्रमण करत होते. नवयुवक मंडळाच्या सदस्यांनी भगवान महावीरांची स्तुती गीते व भजने गाऊन मिरवणुकीची शोभा वाढवली.
         शांतिनाथ भगवान यांचे रथावर पुष्प वर्षा व अक्षत वर्षा करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी आरती करण्यात आली. त्यानंतर जैन मंदिर येथे समारोप करण्यात येऊन जैन समाजाचे सर्व प्रमुख संस्थांद्वारा दीक्षार्थी भगिनीचे सत्कार करण्यात आले. छोटेखानी समारोह चे दीपक राखेच्या यांनी सूत्रसंचालन करतांना लोढाया परिवाराने आजपर्यंत केलेल्या कार्याचा उल्लेख केला.

         कु जिनलचे चुलत भाऊ वहिनी व पुतणी यांनी सुद्धा जैन धर्माचे दीक्षा ग्रहण केली असून जैन धर्माची प्रचार आणि प्रसार करत आहे व परिवाराकडून समाजाला समर्पित केलेल्या जागेवर आज सुंदर असे मंदिर दिमाखात उभे आहे असे नमूद केले, तारण तरण जैन समाजाचे स्वाध्यायी आझाद भाई जैन, वर्धमान जैन श्री संघाचे माजी संघपती प्रा.सुरेश अलिझाड, व माजी संघपती माणकचंद चोपडा या वक्तांनी जैन धर्मात संयम मार्ग किती खडतर आहे व प्रशस्त पण आहे याचे महत्व सांगत मोक्षप्राप्ती साठी संयम शिवाय पर्याय नाही हे पटवून दिले.
            जिनल बेन च्या जीवन परिचय व धार्मिक अभ्यासाची माहिती दीपा शहा मॅडम यांनी करून दिली. शेवटी प्रवचन मध्ये सांगताना त्यागाची महिमा व त्याग करणाऱ्याची महत्ता किती मोठी आहे याचे उदाहरणासह साध्वी भगवंतांनी सभेला उदबोधित केले त्याग व संयम धारणार्यांना सर्वोच्च स्थान असते व त्यांचे गुणगान करण्यासाठीच आपण सर्वजण येथे आलेलो आहोत हे अधोरेखित केले. शेवटी आभार जितेंद्र बोथरा यांनी मानले व मांगलिक श्रवणाने सभेची सांगता झाली रात्री साडेआठ वाजता प्रताप विद्या मंदिर येथे मुंबई निवासी ईशान भाई शहा संचलित संयम संवेदना समारोह संगीतकार कुशल भाई शेठ यांचे उपस्थितीत पार पाडला.

          समारोह मध्ये आई-वडिलांची महत्त्व, गुरुचे स्थान, परिवाराचे स्नेहीजनांचे पाठबळ व समाज बंधूंचे आशीर्वाद या सर्वांचे योगदान संयमीजीवनासाठी किती महत्त्वाचे आहे हे उदाहरणासह पटवून दिले. कुमारी जीनेलने मनोगत व्यक्त केले की कोरोना काळात माझे मनोबल खचले होते तेव्हा धर्म ग्रंथाचे वाचन साधू महाराजांचे उपदेश गुरुनी मैया चे मार्गदर्शन यामुळे मागील दोन वर्षापासून माझ्या मनात वैराग्य भाव जागृत झाले व येणाऱ्या 11 तारखेला चाळीसगाव येथे दीक्षा महोत्सव मध्ये सर्वांनी मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. दोन्ही कार्यक्रमासाठी खानदेशातून विविध ठिकाणाचे समाज बांधव तसेच चोपडा तालुक्याचे सर्व समाजातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दादावाडी नवयुवक मंडळ, भारतीय जैन संघटना चे सदस्य व समाज बांधवांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज