चोपड्यात जैन भगवती दीक्षा निमित्त दीक्षार्थी भगिनीचा दि.25 नोव्हेंबर रोजी वर्षीदान वरघोडाचे आयोजन.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

24/11/2024

चोपड्यात जैन भगवती दीक्षा निमित्त दीक्षार्थी भगिनीचा दि.25 नोव्हेंबर रोजी वर्षीदान वरघोडाचे आयोजन....


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपड्यात जैन भगवती दीक्षा निमित्त दीक्षार्थी भगिनीचा दि.25 नोव्हेंबर रोजी वर्षीदान वरघोडाचे आयोजन....

         चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध कुटुंब स्व.नरसी उमरसी जैन यांची नात व मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र नरसी जैन यांची सुपुत्री मुमुक्षु आत्मा कु. जिनल रवींद्र लोडाया ह्या येणाऱ्या 11 डिसेंबर 2024 रोजी चाळीसगाव येथे प.पू आचार्य कवींद्रसागरसुरीश्वरजी म सा यांचे मुखारविंदने व ‌प पू. जयदर्शिताश्रीजी व हिमांशूश्रीजी म सा यांचे सानिध्यात जैन भगवती दीक्षा समारोह संपन्न होणार आहे.

         त्यानिमित्त तिचे गृह गाव चोपडा येथे सोमवार दिनांक 25 रोजी सकाळी नऊ वाजता दीक्षा निमित्त वर्षीदान वरघोडा काढण्यात येणार असून सदरील वरघोडा बाजारपेठेतील निधी निवास स्थान येथून सुरुवात होणार असून चावडी, गोल मंदिर, राणी लक्ष्मीबाई चौक, गांधी चौक ते मेन रोड पासून जैन मंदिर पर्यंत निघणार आहे. जैन मंदिर येथे समारोप होऊन प पू प्रमोदिताश्रीजी म. सा. यांचे सानिध्यात दीक्षार्थी भगिनीचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येईल व त्यानंतर साध्वी भगवंतांच्या प्रवचन होईल.

         तसेच संध्याकाळी साडेआठ वाजता प्रताप विद्या मंदिर येथे मुंबई निवासी ईशानभाई शहा संचलित संयम संवेदना समारोह सादर होणार असून त्यात संगीतकार मुंबई निवासी कुशल भाई सेठ त्यांची साथ देतील तरी जैन समाजातर्फे व लोडाया परिवार तर्फे उपस्थितीचे आवाहन करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज