ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बालदिन उत्साहात साजरा.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

14/11/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बालदिन उत्साहात साजरा....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बालदिन उत्साहात साजरा....

         स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा बाल दिन शाळेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

        शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, शाळा समन्वयक अश्विनी पाटील आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख दिपाली पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. शाळेतील शिक्षिका माधुरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती सांगितली. शाळेतील विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी दप्तरमुक्त दिवसाचे आयोजन केले होते तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी सहल आयोजित करण्यात आली. चोपडा येथील स्वामीनारायण मंदिरास  विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि सहलीचा आनंद लुटला. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पावनखिंड हा चित्रपट दाखवण्यात आला. सर्व विद्यार्थी शिवकालीन भावविश्वात रममाण होऊन गेले. 
     (डॉ. यांचे क्लिनिक 1 नोव्हेंबर पासून सुरु)

    ‌     इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोख्या क्षेत्र भेटींचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना लेथ मशिन, वेल्डिंग मशिनची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून पाहिलीत आणि स्वनिर्मितीचा आनंद लुटला. 

          इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी चोपडा येथील बापू डेअरीला भेट दिली. दुधावर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांसंबंधित विद्यार्थ्यांनी सखोल माहिती जाणून घेतली. यामध्ये दूध गाळणे, दुधाचे निर्जंतुकीकरण करणे, दुधाचे पॕकेजिंग, दुध शीतगृहाध्ये साठविणे आणि दुधापासून विविध खाद्यपदार्थांची निर्मिती करणे यासारख्या विविध पद्धतींचा समावेश होता. दुधापासून दही, लस्सी, ताक, लोणी, तूप, खवा, पनिर आणि पेढे बनविण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. 

         विविध उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज