जळगांव विमानतळावर प्रवासी संख्येत वाढ होण्यासाठी विकास कामे व्हावेत यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई यांची नागरी विमान वाहतूक मंत्री श्री.राम मोहन नायडू यांच्याकडे मागणी... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

19/12/2024

जळगांव विमानतळावर प्रवासी संख्येत वाढ होण्यासाठी विकास कामे व्हावेत यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई यांची नागरी विमान वाहतूक मंत्री श्री.राम मोहन नायडू यांच्याकडे मागणी...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          जळगांव विमानतळावर प्रवासी संख्येत वाढ होण्यासाठी विकास कामे व्हावेत यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई यांची नागरी विमान वाहतूक मंत्री श्री.राम मोहन नायडू यांच्याकडे मागणी...

         जळगाव विमानतळावर वैयक्तिक प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, हवाई प्रवासाची वाढती मागणी आणि जळगाव व परिसरातील लोकांच्या वाढत्या आकांक्षा लक्षात घेता, जळगाव विमानतळावरील विद्यमान पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची तातडीची गरज असुन जळगांव विमानतळ येथे प्रवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी विविध विविध विकास कामांचा विस्तार करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई यांची नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडू किंजरापु यांची भेट घेऊन मागणी केली.

         यावेळी श्रीमती खडसे यांनी जळगाव शहराचे व विमानतळाचे भौगोलिक महत्व अधोरेखित करून या विमानतळावरून वाढत असलेली प्रवासी संख्या लक्षात घेता वर्तमान धाव पट्टीचा (रन वे) विस्तार करण्याची प्रमुख मागणी या पत्राद्वारे केली आहे. धाव पट्टीचा विस्तार केल्यामुळे बोईंग सारखी मोठी विमाने सुद्धा या विमानतळावर सेवा देण्यास सक्षम ठरतील व प्रवासी क्षमता वाढून जळगाव या शहराला अधिकाधिक अन्य शहरांशी हवाई मार्गाने जोडता येईल. दुसरी महत्वाची मागणी जी केली आहे ती म्हणजे वर्तमान विमानतळाचे टर्मिनल वाढती प्रवाशी संख्या हाताळण्यासाठी अपुरी पडत असल्याने या टर्मिनल संख्या वाढऊन लवकरात लवकर विस्तारीकरण करण्यात यावे ही आहे. 

        या दोघही सुधारणा केल्या मुळे एकूणच जळगाव विमानतळावरून सेवा देणाऱ्या विमानांची व ओघानेच प्रवासी संख्या पण मोठ्या प्रमाणात वाढून जळगाव शहर, जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातील अन्य दोन धुळे व नंदुरबार जिल्हे यांच्या आर्थिक व शैक्षणिक विकासाला चालना मिळेल. विशेषत्वाने जळगाव ते पुणे व पुणे ते जळगाव या मार्गावर नियमित वाहतूक सेवा उपलब्ध आहे. या संदर्भात माननीय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री यांचेशी झालेल्या सविस्तर चर्चे अनुसार संबंधित मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई यांना दिले गेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज