ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा तर्फे डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

27/12/2024

ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा तर्फे डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा तर्फे डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली....

         आपल्या बुद्धी - ज्ञानाने व द्रष्टया विचाराने भारताच्या अर्थ  धोरणाला नव्या आर्थिक उदारीकरणाची जोड देत देशाचा कायापालट तसेच जागतिक पटलावर अर्थव्यवस्थेत भारताचा अमीट ठसा उमटवित भारताला एका नवीन उंची वर नेणारे आर्थिक उदारीकरणाचे जनक , विख्यात अर्थतज्ज्ञ व भारताचे सलग 2 वेळा पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

        या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष विजय करोडपती , विद्यमान अध्यक्ष जयदेव देशमुख यांनी स्व.डॉ.मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी मनमोहन सिंग यांच्या द्रष्ट्या विचारांमुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेला नंतर कलाटणी मिळाली व भारतात आर्थिक सुधारणा झाल्यात असे त्यांच्या कार्या विषयी विजय करोडपती यांनी गौरवोद्गार काढत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपाध्यक्ष जे. एस्. नेरपगारे , कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील , कार्य.सदस्य गोविंदा महाजन व सचिव विलास पाटील खेडीभोकरीकर यासह संघाचे सदस्य उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज