"मोबाईल नव्हते तेव्हा समाजातील मृत्यू घटनांवेळी टेलिफोन नंबरसाठी गुर्जरदिशा उपयोगी पडायचे " ना. गुलाबराव पाटील - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

28/12/2024

"मोबाईल नव्हते तेव्हा समाजातील मृत्यू घटनांवेळी टेलिफोन नंबरसाठी गुर्जरदिशा उपयोगी पडायचे " ना. गुलाबराव पाटील


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         "मोबाईल नव्हते तेव्हा समाजातील मृत्यू घटनांवेळी  टेलिफोन नंबरसाठी गुर्जरदिशा  उपयोगी पडायचे " ना. गुलाबराव पाटील 

        नव्वदच्या दशकातील गुर्जर समाजाचे मुखपत्र मासिक  गुर्जरदिशाचे तेव्हा जे प्रत्येक गावातील समाज बांधवांचे टेलिफोन नंबर असलेले गुर्जर दिशा कॅलेंडर निघायचे ते "तत्कालिन मोबाईल नसलेल्या काळात समाजातील मृत्यूघटनांवेळी गावोगावी आप्तांना निधन वार्ता कळवायला फारच उपयोगी सिद्ध व्हायचे " अश्या शब्दांत नाम. श्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या शुभहस्ते 2025 ची गुर्जरदिशा दिनदर्शिका प्रकाशन करतांना गत गुर्जर दिशा कॅलेंडर  संदर्भातील आठवणीस उजाळा दिला . 

        यावेळी गुर्जर दिशा दिनदर्शिका संपादक विलास पाटील (खेडीभोकरीकर) यांनी गुर्जर दिशा दिनदर्शिका 2025 मध्ये समाजातील धार्मिक , अध्यात्मिक , सामाजिक वास्तू , मंडळं , सामाजिक व्हॉटस्अप समूह  , विविध क्षेत्रातील समाज अभिमान इ. कॅलेंडर वैशिष्ट्यांबाबत कॅबिनेट मंत्री समाज अभिमान श्री .गुलाबराव पाटील यांना माहिती दिली.
       या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी गुर्जर संस्थान जळगांवचे विश्वस्त डी.बी. पाटील (गरताडकर) , श्री. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजेपाटील , हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगांवचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज