यजुर्वेंद्र महाजन यांचे 11 जानेवारीला चोपड्यात व्याख्यान... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

09/01/2025

यजुर्वेंद्र महाजन यांचे 11 जानेवारीला चोपड्यात व्याख्यान...


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         यजुर्वेंद्र महाजन यांचे 11 जानेवारीला चोपड्यात व्याख्यान...

        चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र चोपडा संचलित, विवेकानंद विद्यालयात शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी दुपारी चार वाजता शिक्षण चिंतन परिषद आयोजित केलेली आहे. यात " 21 व्या शतकासाठी मनुष्यघडणीचे शिक्षण " या विषयावर जळगाव येथील दीपस्तंभ व मनोबल यांचे संचालक, शिक्षण क्षेत्र अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते सदस्य राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समिती, राष्ट्रीय मानव व अधिकार आयोग भारत सरकार, स्वतंत्र निदेशक नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भारत सरकारचा उपक्रम, तज्ञ सदस्य दिव्यांग विद्यापीठ स्थापना समिती महाराष्ट्र सरकारचा उपक्रम असे सर्व गुण संपन्न असलेले व्यक्तिमत्व यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

         तरी या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन,सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, मुख्याध्यापक व विश्वस्त नरेंद्र भावे यांच्यासह संपूर्ण विश्वस्त मंडळ यांनी कळवले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज