स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भारतीय जैन संघटना व दि हस्ती बँक आयोजित वक्तृत्व स्पर्धेत ; रंगमंचाचा वापर सह स्वतःचे विचार व महापुरुषाच्या विचारांची काय शिकवण घेतली ? याचा स्पष्ट उल्लेख हवा असे प्रा.राजेंद्र महाजन याचे प्रतिपादन..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

13/01/2025

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भारतीय जैन संघटना व दि हस्ती बँक आयोजित वक्तृत्व स्पर्धेत ; रंगमंचाचा वापर सह स्वतःचे विचार व महापुरुषाच्या विचारांची काय शिकवण घेतली ? याचा स्पष्ट उल्लेख हवा असे प्रा.राजेंद्र महाजन याचे प्रतिपादन.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भारतीय जैन संघटना व दि हस्ती बँक आयोजित वक्तृत्व स्पर्धेत ; रंगमंचाचा वापर सह स्वतःचे विचार व महापुरुषाच्या विचारांची काय शिकवण घेतली ? याचा स्पष्ट उल्लेख हवा असे प्रा.राजेंद्र महाजन याचे प्रतिपादन.....

         स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भारतीय जैन संघटना व दि हस्ती को-ऑप बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धेत रंगमंचाचा वापर सह स्वतः चे विचार व महापुरुषाच्या विचारांची काय शिकवण घेतली ? याचा स्पष्ट उल्लेख हवा असे प्रा.राजेंद्र महाजन त्याप्रसंगी म्हणाले की कोणीतीही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली असेल त्यात फक्त भाषण देणे म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेणे नव्हे. ज्या विषायाचे वक्तृत्व आपण करतो आहोत त्याबद्दल वेगवेगळे मुद्दे हवेत. तसेच ज्या रंगमंचावर आपण वक्तृत्व करण्यासाठी उभे आहोत तो रंगमंच आपणास वापरता आला पाहिजे आणि यासाठी आपले वाचन, टिपणी, महत्वाची आहे आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणून देणारे तसेच त्याच वक्तृत्वातुन हसविण्याची कला असायला हवी. आपल्या तालुक्यातील अरुणभाई गुजराथी, बाबा महाराज सातारकर, शिवाजीराव भोसले, विलासराव देशमुख, असे अनेक उत्तम वक्ते आहेत. यांच्या भाषण म्हणजे एक विचारांची पर्वणीच होय. असे अनेक अनमोल विचार त्यांनी स्वामी विवेकानंद जयंती युवा दिवसा निमित्त भारतीय जैन संघटना व दि हस्ती को-ऑप बँक लि. यांच्या तर्फे  प्रताप विध्या मंदिर येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे आयोजनात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जेथेही चांगले लिहिलेले असेल ते आपण टिपण करून घेण्याची सवय लावून घ्या. आजही अरुणभाई गुजराथी हे कोणीही चांगले भाषण, लिहिलेले, पुस्तकातील वाक्ये ते लिहून घेत असतात आणि त्यांचे वाचन ही अफाट असल्याने ते उत्तम वक्ते तयार झाले आहेत असे वक्ते आपणही व्हायला हवे यासाठी समय सुचकता आपल्या अंगात असायला हवी. असे मौलिक उदाहरण देऊन युवा वर्गाला त्यांनी प्रेरणा दिली. 

        या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दि.हस्ती को-ऑप बँक लिमिटेट चे शाखा अध्यक्ष कुशल अनिल जैन तर मॅनेजर प्रणव गुजराथी , भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, जिल्हा सचिव दर्शन देशलहरा आदी उपस्थित होते. स्पर्धेत शहरातील दहा ते बारा शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी एका  स्पर्धाकाला सात मिनिटे आपले विचार मांडण्यासाठी देण्यात आले होते. स्पर्धाकांनी सात मिनिटात आपले विचार उत्तम प्रकारे मांडले. या स्पर्धेत प्ररिक्षक म्हणून प्रा.राजेंद्र महाजन, सौ.ज्योती टाटीया हे होते. यावेळी परीक्षकांनी दिलेल्या निकाल नुसार प्रथम क्रमांक पंकज माध्यमिक विद्यालयचा विध्यार्थी चेतन दिनेश पाटील याला तर द्वितीय क्रमांक विवेकानंद विद्यालयची कु.काव्या देवेंद्र वाघ, तृतीय क्रमांक महिला मंडळ विद्यालयची कु. मृणाल शिवकुमार गुरव हिने मिळवला तर उत्तेजनार्थ म्हणून प्रताप विद्या मंदिराची विद्यार्थ्यांनी कु.मुग्धा विजय याज्ञीक उत्तेजनार्थ कस्तुरबा विद्यालयची कु.गायत्री विनोद पाटील यानी पटकावला प्रमुख पाहुण्याच्या हस्ते त्याच ठिकाणी बक्षिस देण्यात आले तर ज्यांनी ज्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला अश्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. 

         या कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा कार्यकारणी अभय ब्रम्हेचा तसेच चोपडा शाखा अध्यक्ष - गौरव कोचर, सचिव - मयंक बरडीया, उपाध्यक्ष - आकाश सांड, आंनद आचलिया, ऋषभ कोचर, मनन चोपडा, प्रेम चोपडा, विनीत खिंवसरा, समय चोपडा आदींनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश बरडीया तर आभार प्रदर्शन लतीश जैन यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज