प्रा.एस.टी.कुळकर्णी यांना जीवनगौरव तसेच स्पर्धांद्वारे चोपडा माय मराठी संघ व मसाप शाखेचा मराठी राजभाषा गौरवदिन साजरा ..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

28/02/2025

प्रा.एस.टी.कुळकर्णी यांना जीवनगौरव तसेच स्पर्धांद्वारे चोपडा माय मराठी संघ व मसाप शाखेचा मराठी राजभाषा गौरवदिन साजरा .....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          प्रा.एस.टी.कुळकर्णी यांना जीवनगौरव तसेच स्पर्धांद्वारे चोपडा माय मराठी संघ व मसाप शाखेचा मराठी राजभाषा गौरवदिन साजरा .....

          "GR,CR व FIR सारख्या असंख्य इंग्रजी शब्दांवर जरी सध्या सरकारं चालत असली तरी सुमारे अडीच हजार वर्षाचा प्रदीर्घ, पुरातन वारसा असलेल्या आमच्या अभिजात मराठी भाषेच्या माध्यमातून विचार, आचारांचे संस्कार होत जातात, अमृताहून गोड असलेली आमची ही साहित्याची, तत्त्वज्ञानाची भाषा आता तंत्रज्ञानाचीही भाषा व्हावी " असे प्रतिपादन प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी ज्ञानपीठ पुरस्कारार्थी साहित्यिक वि.वा. शिरवाडकर अर्थात कविवर्य कुसुमाग्रज जयंती निमित्त चोपडा मायमराठी संघ व मसाप शाखेतर्फे साजऱ्या झालेल्या मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात स्पर्धा उद्घाटन व प्रा.एस. टी कुळकर्णी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान प्रसंगी केले .

          या वेळी मायमराठी राज्य अध्यापक संघ शाखा चोपडा तर्फे राज्य उपाध्यक्ष विलास पाटील यांची संकल्पना व प्रायोजकत्वातून ज्येष्ठ मराठी अध्यापक प्रा.एस.टी. कुळकर्णी यांच्या प्रदीर्घ मराठी अध्यापन सेवे प्रती आदर व सन्मान म्हणून त्यांना सपत्नीक मायमराठी चोपडा संघाचा प्रथम ' जीवन गौरव ' पुरस्कार प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला .

          पुरस्काराला उत्तर देतांना त्यांनी मला प्रताप विद्या मंदि द्वारे मराठी अध्यापनाची तसेच नगर वाचन मंदिर माध्यमातून मराठी भाषेची जेव्हा जेव्हा सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हा मी मनःपूर्वक सेवा देण्याचा प्रयत्न केला. आज माझ्या मराठी सेवेचा माय मराठी संघाने जो गौरव केला त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे अशी कृतज्ञ भावना प्रा. श्रीकांत कुळकर्णी यांनी व्यक्त केली. 

          स्पर्धा व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मायमराठी संघाचे राज्य उपाध्यक्ष विलास पाटील यांनी शालेय विद्यार्थ्या मध्ये मराठी भाषेविषयी गोडी वाढून मराठीच्या प्रचार प्रसारास हातभार लावणे आपले कर्तव्य आहे या भावनेतून मराठी मुक्तछंद काव्य वाचन स्पर्धा व मराठी भित्तिपत्रिका स्पर्धेचे माय मराठी संघ व मसाप शाखा चोपडा तर्फे आयोजन करण्यात आले आहे असा कार्यक्रम उददेश व्यक्त केला. स्पर्धा - कार्यक्रम सूत्रसंचालन मायमराठी संघतालुकाध्यक्ष मुख्या.सुनील बा.पाटील यांनी केले तर

        मराठी मुक्तछंद काव्य वाचन स्पर्धेचे परीक्षण कवी अशोक नी.सोनवणे (अध्यक्ष - मसाप चोपडा) व प्रा.श्रीकांत कुळकर्णी यांनी तसेच भित्तिपत्रिका स्पर्धा परीक्षण निवृत्त कला शिक्षक ए.पी.पाटील व प्राचार्य सुनील बारी (ललित कला महाविद्यालय) यांनी केले .

          प्रवेश शुल्क नसलेल्या स्पर्धेच्या 3 गटातील विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना आकर्षक स्मृतीचिन्ह व गौरवपत्र तसेच प्रत्येकी 2 उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज