Post Top Ad
Responsive Ads Here
21/03/2025
Home
Unlabelled
ध्यास निसर्ग सेवेचा... जागर चिमणी संवर्धनाचा ; 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त विवेकानंद विद्यालयात मोफत जलपात्र वितरण
ध्यास निसर्ग सेवेचा... जागर चिमणी संवर्धनाचा ; 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त विवेकानंद विद्यालयात मोफत जलपात्र वितरण
चोपडा तालुक्यासह सर्वत्र होत असलेले वाढते प्रदूषण , वृक्षतोड , मोबाईल टॉवर्सद्वारे निर्माण होणाऱ्या लहरी , पिकांवरील अतिघातक रसायनांची फवारणी , नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास , काँक्रीट इमारतींचे बांधकाम , ऋतुचक्रातील बदल इ. सारख्या अनेक कारणांनी चिमणी व परिसरातील सामान्य पक्ष्यांची संख्या गेल्या दोन - तीन दशकांपेक्षा जास्त कालावधी पासून रोडावत चालली आहे. पक्षी हे निसर्ग साखळीतील महत्त्वाचे घटक व वसुंधरेचे बोलके अलंकार आहेत. त्यांचे संवर्धन व संरक्षण खूप महत्त्वाचे आहे , या विचाराने विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी पक्षी , वन्यजीव व वन संवर्धनासाठी कार्यरत असलेले विद्यालयाचे शिक्षक , पक्षी व वन्यजीव अभ्यासक श्री हेमराज पाटील (संस्थापक - सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था , चोपडा तसेच केंद्रीय समिती सदस्य - वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग , दिल्ली) यांनी 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त विवेकानंद विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना 150 मातीचे जलपात्र मोफत वितरित केले. गेल्या दहा वर्षांपासून मोफत जलपात्र वितरणाचा कृती कार्यक्रम यशस्वीरित्या अखंडितपणे सुरू आहे. तसेच उन्हाळ्यात अजून जलपात्र वितरणाचे निसर्ग सेवा कार्य सुरू राहणार आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here






No comments:
Post a Comment